निरामय संस्थेतर्फे रक्तदान शिबिर

निरामय संस्थेतर्फे रक्तदान शिबिर

निरामय संस्थेतर्फे
रक्तदान शिबिर

रत्नागिरी ः रत्नागिरीतील नामांकित योगसंस्था ''निरामय''चे आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त योगगुरू वीरू स्वामी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निरामयचे साधक एक सामाजिक उपक्रम म्हणून येथील रेडक्रॉस सोसायटी येथे रक्तदान करणार आहेत. शनिवारी (ता.१५) सकाळी आठ ते बारा या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार आहे. निरामय योग संस्थेमध्ये अनेक योगप्रेमी नियमित प्रत्यक्ष योगाचे प्रशिक्षण घेत असतात. निरामय योगसंस्थेकडे ऑनलाईन योग प्रशिक्षणाची उत्तम सुविधा असल्याने देश-विदेशातील अनेक साधक या द्वारे निरामयशी जोडले गेले आहेत.
या सामाजिक उपक्रमांत इतरही रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन निरामय योगसंस्थेतर्फे करण्यात येत आहे. सर्व रक्तदात्यांना कार्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी निरामय योगसंस्थेशी संपर्क साधावा.
----------------

‘सेवा भारती’तर्फे
मोफत पाणीवाटप

साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली खालचीवाडी येथील २५ कुटुंबांना दररोज सेवा भारती कोकण प्रांत जिल्हा दक्षिण रत्नागिरी यांच्यावतीने मोफत पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पाणीपातळीत घट झाली आहे. विघ्रवली खालचीवाडी येथील २५ कुटुंबांना पाणी पाणी करण्याची वेळ आली होती. याची दखल सेवा भारती कोकण प्रांत जिल्हा दक्षिण रत्नागिरीने घेत या कुटुंबांना ८ मे पासून दररोज ३ हजार लिटर पाणी टँकरच्या माध्यमातून मोफत दिले. यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. जोपर्यंत पाणीसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत दररोज मोफत पाणीवाटप करण्यात येणार असल्याचे सेवा भारती संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
---------

- rat६p१७.jpg-


रामेश्वर महाडीक
------------
रामेश्वर महाडीकला
डेकॅथलॉनमध्ये कास्य

रत्नागिरी ः वरिष्ठ गट राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या रामेश्वर महाडिकने डेकॅथलॉन क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकावले. वरिष्ठ गटात डेकॅथलॉनमध्ये पदक मिळवणारा तो कोकणातील पहिला खेळाडू ठरला आहे. नागपूर येथे वरिष्ठ गटाची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा झाली. दहा क्रीडाप्रकारात रामेश्वरने ५२१६ गुण मिळवत तिसऱ्या क्रमांकासह कास्यपदक पटकावले. मुंबईचा अनुपकुमार सरोज (५७४७) प्रथम तर सोलापूरचा प्रशांत लष्करेने (५६७०) गुणांसह दुसरा कमंक पटकावला. १०० मीटर, ४०० मीटर, १५०० मीटर, ११० मीटर हर्डल्स, लांब उडी, उंच उडी, पोलवॉल्ट, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक असे दहा क्रीडाप्रकारांचा डेकॅथलॉनमध्ये समावेश असतो. या सर्व क्रीडाप्रकारात रामेश्वर महाडीकने पहिल्या पाच क्रमांकामध्ये स्थान कायम राखले होते. त्याला प्रशिक्षक अविनाश पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रामेश्वरच्या यशाबद्दल रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळा कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सचिव संदीप तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com