-आरोग्य कर्मचारी निवासस्थानांची दूरवस्था

-आरोग्य कर्मचारी निवासस्थानांची दूरवस्था

-Rat६p६.jpg ः
२४M८८३३०
पाऊस सुरू झाला तरी आरोग्यकेंद्राच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे.
---------------

आरोग्य कर्मचारी निवासस्थानांची दूरवस्था

ग्रामीण भागात अधिकाऱ्यांना अडचणी; तुटलेल्या छप्पर, खिडक्या
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ६ ः शासकीय कर्मचारी अनिवार्य असतानाही मुख्यालयात राहात नाहीत, अशी सार्वत्रिक तक्रारीचा सूर तालुक्यातून होत असताना शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे प्रशासकीय यंत्रणा मात्र कमी पडत आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.
सुविधांच्या अभावामुळे कर्मचारी कर्तव्यावर वेळेवर उपस्थित न राहिल्यास त्यांचे खापर कर्मचाऱ्यांवर टाकले जाते. तालुक्यातील सर्वच खात्यांच्याबाबतीत ही ओरड असून अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक, वायरमन, तलाठी हे महत्वाचे घटक त्यांच्या मुख्यालयात राहात नसल्याची तक्रार वेळोवेळी होत असते. आरोग्य हा अतिशय संवेदनशील विषय असून, नागरिकांचे आरोग्य व जीविताचे रक्षण करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्यकेंद्र, उपकेंद्र अशा पायाभूत सुविधांचे मोठे जाळे तालुक्यात उभे करण्यात आले आहे; मात्र त्यासाठी आवश्यक असलेले व आरोग्य विभागाच्या निकषात बसणारे वैद्यकीय अधिकारी व तांत्रिक कर्मचारी हे स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाहीत. ही तालुक्याची गेल्या दशकाची समस्या आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना योग्य व कालसंगत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे संबंधित यंत्रणेचे अग्रक्रमाचे काम असताना आरोग्ययंत्रणा याकडे लक्ष देत नाही.
ग्रामीण रुग्णालयाचा अपवाद वगळता प्राथमिक आरोग्यकेंद्रांपासून खालच्या पातळीवर सुविधांची वानवा आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासासाठी आवश्यक असणाऱ्या क्वार्टर्सची अवस्था बिकट आहे. इमारती गळत आहेत, इमारतींना वीज व पाणीपुरवठा नाही, दरवाजे-खिडक्या नाहीत एकना अनेक समस्या आहेत. अशा परिस्थितीत माणूस तेथे राहणे शक्य नसताना यंत्रणा मात्र कर्मचाऱ्यांकडून शंभर टक्के कामाची अपेक्षा करते. कुंबळे, देव्हारे, पंदेरी, येथील कर्मचारी निवासस्थानांचे वेळोवेळी ऑडिट करून कमी असलेल्या गोष्टी अथवा अडचणींचे निराकरण होणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com