शिवसेना शिंदे गटाचा फलक अनोळखीने फाडला

शिवसेना शिंदे गटाचा फलक अनोळखीने फाडला

शिवसेना शिंदे गटाचा
फलक अनोळखीने फाडला
कणकवली, ता. ६ : शिवसेना शिंदे गटाकडून नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा फलक लावण्यात आला होता. या फलकातील शिवसेना नेते किरण सामंत आणि जिल्‍हाप्रमुख संजय आंग्रे यांचे छायाचित्र असलेला भाग अनोळखी व्यक्तीकडून फाडण्यात आला. या प्रकाराची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
राणे यांच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी त्‍यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आलेले आहेत. यात शिवसेना शिंदे गटाकडूनही येथे राणेंच्या अभिनंदनाचा फलक काल (ता. ५) लावण्यात आला होता. आज सकाळी मात्र या फलकामधील शिवसेना नेते किरण सामंत आणि शिवसेना जिल्‍हाप्रमुख संजय आंग्रे यांचे छायाचित्र असलेला भाग अनोळखीने फाडला असल्‍याचे आढळले. त्‍यामुळे या घटनेची जोरदार चर्चा शहरात रंगली होती. राणे यांना सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघात भरघोस मतदान झाले. या उलट रत्‍नागिरी जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात राणे पिछाडीवर राहिले. याचीही चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com