सिंधुदुर्गच्या ''एआरटी'' सेंटरचा गौरव

सिंधुदुर्गच्या ''एआरटी'' सेंटरचा गौरव

88418

सिंधुदुर्गच्या ''एआरटी'' सेंटरचा गौरव
''गुरुप्रसाद''चा पुढाकार ः दहा वर्षांच्या यशस्वी सेवेची दखल
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ ः एड्सग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि एड्सवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात एड्स नियंत्रण प्रकल्प सुरू करून २० वर्षे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० वर्षे झाली. हा प्रकल्प यशस्वीपणे राबविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा ए.आर.टी. सेंटरचा विहान प्रकल्पाच्या रत्नागिरी येथील गुरुप्रसाद संस्थेमार्फत गौरव करण्यात आला.
''एचआयव्ही''सह जीवन जगणाऱ्या लोकांसाठी शासनाच्या वतीने ए.आर.टी. औषधोपचार मिळवून देण्यासाठी ही केंद्र सुरू करण्यात आली. हा प्रकल्प २००४ मध्ये सुरू करण्यात आला. त्यात प्रथम महाराष्ट्रातील जे.जे. हॉस्पिटलयेथे एआरटी सेंटर सुरू करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुणे, सांगली, कोल्हापूर आणि इतर ठिकाणी एआरटी सेंटर सुरू झाली. सिंधुदुर्ग येथे एआरटी सेंटर २०१३ मध्ये सुरू झाले. हे सेंटर यशस्वीरित्या चालविण्यासाठी एआरटी सेंटर स्टाफ तसेच जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांचा मोलाचा वाटा आहे. वीस वर्षे सातत्याने एखादा प्रकल्प चालू ठेवणे, ही सोपी गोष्ट नाही; परंतु एआरटी सेंटरच्या संपूर्ण टिमने वसा घेतल्यासारखा हा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू ठेवला. त्याबद्दल एड्स नियंत्रण प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या रत्नागिरी येथील गुरुप्रसाद संस्थेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शाम पाटील, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग आणि एआरटी सेंटर यांचा कृतज्ञता म्हणून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग सिंधुदुर्गचे प्रमुख सुनील ढोणुकसे आणि डॉ. नागवेकर, कर्मचारी रश्मी गावडे व सर्व एआरटी सेंटरचा स्टाफ उपस्थित होता. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीने सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी हा सत्कार स्वीकारला. याप्रसंगी गेली १० वर्षे यशस्वीपणे एआरटी उपचार घेऊन आपले जीवन जगत असलेल्या व्यक्तींचा एक ग्रुप फोटोही एआरटी सेंटरला देण्यात आला. कौन्सेलरच्या इथे राहून कौन्सिलिंग करताना दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या व्यक्ती म्हणून इतर संसर्गित व्यक्तींना त्यांचा आदर्श दाखविण्यासाठी या फोटोचा उपयोग करावा, असे आवाहन गुरुप्रसाद संस्थेच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी गुरुप्रसाद संस्थेचे श्री. राजवाडे, सुनील जाधव, सिंधुदुर्गमधील कर्मचारी अनिल कदम आणि नलिनी खोत उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com