जिल्ह्यात सहा हजार किलो कचऱ्याचे संकलन

जिल्ह्यात सहा हजार किलो कचऱ्याचे संकलन

- rat६p३४.jpg-
P२४M८८४३९
रत्नागिरी ः तालुक्यातील मिरजोळे ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात आलेल्या मोहिमेत स्वच्छता करताना

- rat६p३३.jpg-
२४M८८४३६
रत्नागिरी ः मिरजोळे येथे राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई आदी.

----------

जिल्ह्यात सहा टन कचरा संकलन

मान्सूनपूर्व स्वच्छतामोहीम; कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः जागतिक पर्यावरणदिनानिमित्त जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मान्सूनपूर्व श्रमदान मोहिमेचे आयोजन केले होते. त्यामध्ये सहा हजार किलो घनकचरा व प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेने सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबवलेल्या मोहिमेत सार्वजनिक कचऱ्याचे ढिगारे असलेल्या ठिकाणी, ग्रामपंचायत स्तरावरील सर्व मंदिरे शासकीय कार्यालये, नदी परिसर, बाजार परिसर अशा ठिकाणी श्रमदान करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी पडलेले प्लास्टिक गोळा करण्यात आले तसेच पावसाळ्यात कचऱ्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती व रोगराई उद्‌भवू नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात या मोहिमेचे आयोजन केले गेले. या मोहिमेत ४ हजार ६३६ किलो घनकचरा व १ हजार ५२० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छतामोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार, राहुल देसाई सहभागी झाले होते. त्यामध्ये शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतीत रस्त्यावर जास्त कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. या कचऱ्याचे व्यवस्थापन होण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रयत्न करावे तसेच जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून दंडात्मक कार्यवाही ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. मिरजोळे येथील स्वच्छता श्रमदान मोहिमेत रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, विस्तार अधिकारी पी. एन. सुर्वे, मिरजोळे सरपंच गजानन गुरव, ग्रामसेवक गजानन बडद, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
-----
कोट
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ, व्यापारी यांचे प्रबोधन करून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी घेतली जावी. तसेच घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे.

- कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com