लोकसहभागातून उभारली प्रवासी निवाराशेड

लोकसहभागातून उभारली प्रवासी निवाराशेड

काही सुखद---लोगो

-rat६p३१.jpg-
P२४M८८४३४
संगमेश्वर ः धामणी येथे लोकसहभागातून उभारलेली निवाराशेड.
------------
लोकसहभागातून उभारली प्रवासी निवाराशेड

प्रवाशांकडून कौतुक; छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी स्तुत्य उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ६ ः महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने तोडण्यात आलेल्या निवाराशेड अद्याप उभारलेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक थांब्यावर ऊन व पावसात गाडी येईपर्यंत विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यावर तिष्ठत उभे राहावे लागते. हा त्रास ओळखून धामणी येथील काही मंडळींनी एकत्र येऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक तात्पुरती शेड उभारण्याचा एका स्तुत्य उपक्रम राबवला.
धामणी बसथांब्यावर दोन्ही बाजूला बसथांब्याचे फलक नव्हते. त्या ठिकाणी दोन्ही बाजूला डिजिटल बसथांबा असे फलक लावण्यात आले. तसेच जास्त वर्दळ किंवा रहदारी संगमेश्वरच्या भागाकडे असल्याने त्या रस्त्याच्या बाजूला बांबू, प्लास्टिक वापरून छप्पर करून व बाजूने पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून त्याही बाजू बंद करण्यात आल्या. आत बसण्यासाठी तात्पुरते कडप्पा ठेवून बाकडी तयार केली.
ही प्रवासी निवाराशेड आज छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली. समाजसेवेसाठी रामदेव सेल्स, प्रकाश घाणेकर, अजित कोळवणकर, सिद्धेश खातू, अमोल गुरव, स्वपनील सुर्वे, प्रथमेश घाणेकर, प्रणव कोळवणकर, निनाद प्रसादे, ओमकार देवरूखकर, प्रतीक घाणेकर आदींनी योगदान दिले.

---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com