राष्ट्रमंदिराच्या पुनर्निर्माणासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे

राष्ट्रमंदिराच्या पुनर्निर्माणासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे

-rat६p३२.jpg ः
P२४M८८४३५
दापोली : विविध प्रात्याक्षिके सादर करताना शिबिरार्थी.
--------------

राष्ट्रमंदिराच्या पुनर्निर्माणासाठी प्रत्येकाने पुढे यावे

भाग्यश्री साठे ः राष्ट्रसेविका समितीचे दापोलीत प्रशिक्षण वर्ग
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ६ : राममंदिरातून राष्ट्रमंदिराच्या पुनर्निर्माणासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे व त्यासाठी स्वसंरक्षणक्षम बनून (स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वत्वाचे पालन करून) आपली नागरिक कर्तव्ये पार पाडली पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या विश्व विभाग संपर्कगटाच्या सदस्य व महिला समन्वय अखिल भारतीय सहसंयोजिका भाग्यश्री साठे यांनी केले.
राष्ट्रसेविका समितीचा कोकण प्रांताचा प्रशिक्षण वर्ग दापोली येथे आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये झाला. त्याच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाग्यश्री साठे म्हणाल्या, आपल्या कुटुंबातून १५ दिवस या वर्गासाठी देणे महत्वाचे आहे. अशा प्रकारच्या वर्गातून घडणारे कार्यकर्ते संघटनेसाठी पर्यायाने समाजासाठी, देशासाठी कार्यरत असतात. सामूहिक जीवनपद्धतीचे एक प्रमुख प्रशिक्षण या वर्गातून दिले जाते. शिस्त, समायोजन, वेळ पाळणे, परिश्रम याचा अनुभव या वर्गातून मिळतो. या १५ दिवसाच्या वर्गात मोबाईल बाजूला ठेवून सहभागी व्हावे लागते. या वेळी दापोली येथील ज्येष्ठ साहित्यिक रेखा जेगरकल, कोकण प्रांत कार्यवाहिका पद्मश्री फाटक, वर्गाधिकारी राधा भिडे उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींनी सघोष मानवंदना, दंड, यष्टी, योगचाप, नियुद्ध याची प्रात्यक्षिके सादर केली. १५ दिवसीय वर्ग कालावधीत विविध शारीरिक, बौद्धिक विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका सुनीता हळदेकर, पद्मश्री दादा इदाते आदींनी मार्गदर्शन केले. या वर्गात प्रांतातील ९ जिल्ह्यांतून ५८ शिबिरार्थी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com