बांद्यात भाजप कार्यकर्त्यांकडून रस्त्याची श्रमदानाने साफसफाई

बांद्यात भाजप कार्यकर्त्यांकडून रस्त्याची श्रमदानाने साफसफाई

88463

बांद्यात भाजप कार्यकर्त्यांकडून
रस्त्याची श्रमदानाने साफसफाई
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ः शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत येथील मच्छिमार्केट-पाटो पूल ते मुंबई-गोवा महामार्गापर्यंतच्या जोडरस्त्याची आज श्रमदान करत साफसफाई केली. या रस्त्यावर पूर्णपणे झाडीझुडपे वाढल्यामुळे रहदारीला त्रास होत होता. या मोहिमेत रस्त्यावरील वाढलेली झाडीझुडपे साफ करण्यात आली. रस्त्याची देखील साफसफाई करण्यात आली.
याबाबत शैलेश केसरकर यांनी सांगितले की, ‘येथून ये-जा करणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा त्रास होत होता. नागरिकांच्या तक्रारी येत होत्या, त्यामुळे आम्ही एकत्र येत नागरिकांना होणारा त्रास ओळखून आज श्रमदानाने साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. गुरू कल्याणकर यांनी हा रस्ता हा निमजगा, गडगेवाडी, गवळीटेंब नागरिकांना बाजारपेठेत, मच्छीमार्केटमध्ये व इतर कामाकरिता येण्यासाठी अतिशय महत्त्वाचा व सोईस्कर असल्याचे सांगितले. पावसात कायम या रस्त्यावर खड्डे व चिखलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी रस्ता लवकरात लवकर काँक्रिटीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. रस्त्याची साफसफाई करण्यात आल्याने येथून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बांदा भाजप शक्तिकेंद्रप्रमुख मनोज कल्याणकर, बांदा शहर युवा मोर्चा अध्यक्ष साई सावंत, गुरू कल्याणकर, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com