अतिक्रमण हटवताना चिपळुणात झटापट

अतिक्रमण हटवताना चिपळुणात झटापट

ratchl६२.jpg ः
P२४M८८४७६
चिपळूण ः शहरातील बाजारपेठेत गटारावरील अतिक्रमणे हटविताना अधिकारी, कर्मचारी

चिपळुणात अतिक्रमण हटवताना झटापट

पालिका थेट पोलिस ठाण्यात ; मालक, कामगारांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः गटारावरील अतिक्रमण हटविताना बाजारपेठेतील एका दुकानदाराने पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. कामगारांसोबतच्या बाचाबाचीबरोबरच दमदाटी व झटापट झाल्याने पालिका प्रशासनाने संबंधित दुकानदाराविरोधात थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. ही घटना गुरूवारी सकाळी बाजारपेठ परिसरात घडली. या कारवाईमुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
शहरातील व्यापारीवर्गाच्या सूचनेनुसार, पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील गटारे साफसफाईचे काम हाती घेतले आहे. गेले दोन दिवस ही स्वच्छतामोहीम सुरू असून, या दरम्यान दुकानदार, व्यावसायिक यांनी गटारावर टाकलेले लेंटर, कडप्पे, स्लॅब यांसारखे अतिक्रमण काढले जात आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी स्वत: या कारवाईत लक्ष घातले आहे. काही ठिकाणी दुकानदार व कामगार यांच्यासोबत शाब्दिक चकमक उडत असल्याने कामगारांनी ही गोष्ट प्रशासनाच्या कानावर घातली होती. त्याची तातडीने दखल घेत बुधवारी गटारांवरील अतिक्रमण हटवण्याची सर्व व्यापारीवर्गाला कल्पना दिली होती. अतिक्रमण न काढल्यास साहित्य जप्त करण्याचा इशाराही दिला होता.
आज बाजारपेठ, जुना बसस्टँड ते नाथ पै चौक, पानगल्ली या ठिकाणी अतिक्रमण विभागप्रमुख संदेश टोपरे, बांधकाम विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत सकाळी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असताना एका दुकान मालकांनी गटारावर व रहदारीच्या रस्त्याला अडथळा निर्माण होईल असे कपड्यांची जाहिरात करणारे पुतळे उभे केले होते. सूचना करूनही त्यांनी ते हटविले नाहीत. त्यामुळे पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी तेथील साहित्य जप्त करण्यास सुरवात केली; मात्र याचवेळी दुकानाचे मालक लियाकत सलिम मेमन व त्यांचे कर्मचारी जमीर जैमुद्दीन सय्यद यांनी त्यास अडथळा केला तसेच अर्वाच्च भाषा वापरून दमदाटी व झटापट केली. याबाबतची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आस्थापना विभागप्रमुख राजेंद्र जाधव, वाहन विभागप्रमुख संतोष शिंदे, नागरी सुविधा केंद्रप्रमुख वलिद वांगडे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर, गणेश कदम, सचिन शिंदे, रमेश कोरवी आदी अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेऊन कारवाई केली तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मालक व कामगार यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com