सातारा येथील अपघातात आंबोलीतील तरुणाचा मृत्यू

सातारा येथील अपघातात आंबोलीतील तरुणाचा मृत्यू

M88526

सातारा येथील अपघातात
आंबोलीतील तरुणाचा मृत्यू
मृत कामतवाडीतीलः पुण्यात कामाला जाताना दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. ६ ः सातारा खंबाठा घाटात दुचाकीची खांबाला धडक बसून झालेल्या अपघातात येथील कामतवाडीतील तरुणाचा मृत्यू झाला. आदिनाथ ज्ञानेश्वर गावडे (वय २४) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता.४) मध्यरात्री ३ वाजता घडली. मात्र, काल (ता.५) रात्री उघडकीस आली. आदिनाथ हा आंबोली लिंगवाडी कितवडे येथून दुचाकीवरुन पुणे येथे कामाला जात असतानाही ही दुर्घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की ः आदिनाथ हा पुणे येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. आंबोली लिंगवाडी कितवडे येथून मामाकडून तो मंगळवारी रात्री १0 वाजता जाण्यासाठी निघाला. त्याच्यासोबत अजून एक मित्र होता. ते दोघे आजरा पोहचल्यानंतर त्याचा मित्र खासगी बसने पुणे येथे गेला. आदिनाथ हा एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला. सातारा खंबाठा घाटात पोहचला असता त्याच्या दुचाकीची खांबासह कठाड्याला धडक बसून तो खाली पडला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com