श्रीकांत कांबळींचे 20 जूनला उपोषण

श्रीकांत कांबळींचे 20 जूनला उपोषण

श्रीकांत कांबळींचे २० ला उपोषण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः शहरातील अनधिकृत टपऱ्या, विविध प्रकल्पांचा होणार दुरूपयोग आणि बसस्थानकासमोरील पार्किंग जागेत होणारे खासगी बसेसचे अतिक्रमण या विरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत रामचंद्र कांबळी यांनी २० जूनला उपोषणाचा इशारा दिला आहे.
चिपळूण पालिकेने लाखो रुपये खर्च करून उक्ताड येथील वाहनतळ उभारले आहे. ते वाहनतळ सध्या वापराविना पडून आहे. मच्छी व मटणमार्केट, भाजीमंडई हे प्रकल्प पूर्ण झाले असूनही त्यांची उद्घाटने झालेली नाहीत. भाजीमंडई असूनही भाजीविक्रेते बाहेर व्यवसाय करीत आहेत. मच्छी व मटणमार्केट येथेही तीच परिस्थिती आहे. चिंचनाका ते बसस्थानकादरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूने अनधिकृतरित्या अनेक टपरीधारकांनी व्यवसाय थाटला आहे. आगारातून गाडी बाहेर पडताना अडथळा निर्माण होत असून त्याचा पादचाऱ्यांना त्रास होते. पालिकेमार्फत बसस्थानकासमोर नव्याने विकसित होणाऱ्या वाहनतळ येथे अनधिकृतपणे व फुकटचे खासगी बसेसचे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे कामाचा दर्जा खालावला आहे. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कांबळी यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती; मात्र या निवेदनाची दखल न घेतल्याने कांबळी यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com