मंडणगड-चिंचाळी धरण परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड

मंडणगड-चिंचाळी धरण परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड

88580

चिंचाळी धरण परिसरात
बेकायदेशीर वृक्षतोड
वाकवलीतील शेतकऱ्यांची तक्रार ; दोनशे वर्षे जुनी झाडे तोडली
मंडणगड, ता. ७ः चिंचाळी धरण परिसरातील मौजे वाकवली येथील शेतकऱ्यांच्यावतीने त्यांच्या जागेत झालेल्या अनधिकृत वृक्षतोडीबाबत तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांच्याकडे ६ जूनला तक्रारीचे निवेदन सादर केले आहे. या वेळी शेतकरी संतोष अबगूल, राजेश साळवी, सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे उपस्थित होते.
मौजे वाकवली या गावातील शेतकऱ्यांचे मालकीच्या जागेतील सुमारे दोनशे वर्ष जुनी असलेली झाडे कोकण वैभव बालाजी डेव्हलपर्स यांनी विनापरवाना तोडल्याने संबंधितांच्या विरोधात पंचनामा करून कायदेशीर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. कोकण वैभव बालाजी डेव्हलपर्स यांनी वाकवली येथील जमीनमालक श्रीमती पार्वती भिकू अबगूल (वय ८०), यांच्या नावे असलेल्या सामायिक जमीन मिळकतीमधील दोनश वर्षे जुनी असलेली विविध जातीची झाडे तोडून नष्ट केली.
त्यामुळे सुमारे २ कोटीचे नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच जमिनीमधील शासकीय हद्दीबाबतचे ऐरणी बुरूज खोदकाम करून नष्ट केले आहेत. याकडे संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ही सुरू असलेली वृक्षतोड थांबवून संबंधितांविरोधात पंचनामा करून कायदेशीर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी निवेदनात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com