एन. एस. चॅम्पियन ट्रॉफी देसाई क्रिकेट अॅकॅडमीने जिंकली

एन. एस. चॅम्पियन ट्रॉफी देसाई क्रिकेट अॅकॅडमीने जिंकली

rat७p९.jpg-
P२४M८८६२७
ओळी ः एन. एस. चॅम्पियन ट्रॉफी पटकावणारे येथील (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे खेळाडू.
-----
देसाई क्रिकेट अॅकॅडमीचा विजय

टी-२० तिरंगी लढत ; सार्थक देसाईचे दुसरे शतक

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः तालुक्यातील कोळंबे येथील सावंत (सोसा) स्टेडियमवर एन. एस. क्लब नवी मुंबई, सागंली क्रिकेट क्लब व (कै.) छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी रत्नागिरी या संघामध्ये टी-२० लीग तिरंगी क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेमध्ये छोटू देसाई अॅकॅडमीने एन. एस. चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले.
या स्पर्धेत छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने सांगली क्रिकेट संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. नवी मुंबई संघाने सांगली संघाचा पराभव केल्यामुळे अंतिम सामना छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी व एन. एस. क्लब नवी मुंबई यांच्यामध्ये झाला. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीने २० षटकात ३ बाद १८५ धावा केल्या. त्यामध्ये सार्थक देसाई याने सलग दुसरे शतक झळकावले. त्याला अनुज देसाई याने ३० धावा करून मोलाची साथ दिली. प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या एन. एस. क्लब नवी मुंबई यांचे सर्व गडी ९० धावात बाद झाले. मालिकावीर म्हणून सार्थक देसाई (सीडीसीए), उत्कृष्ट फलंदाज- सार्थक देसाई, उत्कृष्ट गोलंदाज- श्रेयस शिंदे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -गुरूप्रसाद म्हस्के, मॅन ऑफ दी मॅच- सार्थक देसाई, उत्तेजनार्थ रोहन कदम- एन. एस. क्लब नवी मुंबई आदींना गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com