लोकसहभागातून विहिरींची साफसफाई

लोकसहभागातून विहिरींची साफसफाई

88634
88635


लोकसहभागातून विहिरींची साफसफाई
पावसापूर्वीचे अभियान; जलस्रोतासह परिसराची स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ः तालुक्यातील गावोगावी पावसापूर्वीचे पाणीपुरवठा करणाऱ्या जागांचे स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून पिण्याच्या विहिरींची अंगमेहनतीने साफसफाई करण्यात येत आहे. चिखल, पालापाचोळा, दगडधोंडे काढून पावसाचे स्वच्छ पाणी साठविण्यासाठी ग्रामस्थ, महिलांनी परिश्रम घेतले.
पावसाळ्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची साफसफाई करून स्वच्छ पाणी मिळण्याच्या हेतूने अनेक गावांतून विहिरींची स्वच्छतामोहीम राबविण्यात आली. वर्षभर जमा झालेला कचरा, घाण, गाळ काढण्यात आला. नव्याने साचणारे पावसाचे पाणी दूषित होऊ नये म्हणून दरवर्षी प्रमाणे एक दिवस पाणी स्वच्छता श्रमदान मोहीम राबवून गावच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली. पावसाळा तोंडावर आल्याने सध्या तालुक्यातील अनेक गावांतील विहिरी गावाच्या श्रमदानातून साफ केल्या जात आहेत. तालुक्यांत गावागावांत पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहिरी आहेत.
सर्वच गावातून नळपाणी योजना कार्यान्वित असली तरी एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. त्या वेळी या विहिरीतील पाणी हंड्यातून डोक्यावरून घरी आणले जाते. वर्षभर या विहिरीत पालापाचोळा, धूळ, पावसाचे पाणी जाऊन गाळ निर्माण होतो तसेच पाण्यात अनेक जलचर असतात. जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर विहिरीतील झरे नव्याने वाहण्यास सुरवात होते. त्या आधी गावातील ग्रामस्थ एकत्रित येत अशा विहिरी साफ करून त्यातील गाळ काढतात. पालेकोंड येथील ग्रामस्थ, महिलांनी शिडीच्या साह्याने वीस फूट विहिरीच्या तळाशी जात दूषित पाणी उपसा करून गाळ काढला. गाळ काढलेल्या विहिरी कोरड्या झाल्या असून, पावसाची प्रतीक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com