राजापुरात रात्रभर मुसळधार पाऊस

राजापुरात रात्रभर मुसळधार पाऊस

M88668
88667

राजापुरात रात्रभर मुसळधार पाऊस
विजेचा खेळखंडोबा : शिवणे खुर्दमध्ये घराची भिंत कोसळली
राजापूर, ता. ७ : दिवसभर ढगाळ वातावरणानंतर विश्रांती घेतलेला पाऊस गुरुवारी (ता. ६) रात्रभर मुसळधार बरसला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट करीत पडलेल्या पावसाने शेतमळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा धुमधडाका सुरू असताना रात्रभर विजेचा खेळखंडोबा सुरू होता. या पावसामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील शिवणे खुर्द येथील जयप्रकाश वैद्य यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले.
गुरुवारी दिवसभर तालुक्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि आकाश निरभ्र होते. त्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हे नव्हती. मात्र, रात्री गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला होता. शेतमळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसामुळे रात्रभर वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. पावसामुळे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये वाढ होण्यास मदत झाली असून, ग्रामीण भागातील पाणी टंचाई संपुष्टात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com