बांद्यात भाजपचा बालेकिल्ला भक्कम

बांद्यात भाजपचा बालेकिल्ला भक्कम

बांद्यात भाजपचा बालेकिल्ला भक्कम

राणेंना मताधिक्य ः संघटनात्मक ताकद पथ्थ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ ः भाजपचा गेली ३० वर्षे अभेद्य बालेकिल्ला असलेल्या बांदा शहरात भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी अपेक्षेप्रमाणे ९४७ मतांचे मताधिक्य घेतले आहे. निवडणूक कोणतीही असो भाजपच्या उमेदवाराने शहरात विक्रमी मताधिक्य घेण्याची परंपरा लोकसभा निवडणुकीतही बांदा शहराने कायम राखली.
बांदा शहरात नारायण राणे यांना २ हजार १६५ मते तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना १ हजार २१८ मते मिळाली. बांदा शहरात भाजपची संघटनात्मक ताकद असून याच जोरावर बांदा शहर ग्रामपंचायतीत भाजप गेली ३० वर्षे एकहाती सत्ता काबीज करत आहे. तुलनेत शिवसेनेचे याठिकाणी संघटन कमकुवत असल्याने याचा फटका श्री. राऊत यांना बसला. बांदा शहरातील मतदार हे नेहमीच भाजपच्या बाजूने राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीत याठिकाणी भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच प्रियांका नाईक यांनीदेखील १५०० हून अधिक मतांनी विजय मिळविला होता. त्या तुलनेत राणे यांना ९४७ मतांचे मिळालेले मताधिक्य हे कमीच आहे. मुस्लिमवाडीत नारायण राणे यांना केवळ ५० तर शिवसेनेचे साई काणेकर यांचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये राणे यांना केवळ २८ मतांचे मताधिक्य मिळाले.
--
बांदा शहरातील मतदान
बूथ क्रमांक*प्रभाग*नारायण राणे*विनायक राऊत
२०५*उभाबाजार,मोर्येवाडा,आळवाडा*३६४*२५१
२०६*देऊळवाडी, मुस्लिमवाडी*३२१*२७१
२०७*हॉस्पिटल कट्टा, आंबेडकर नगर*२४६*२१८
२०८*जुना स्टॅन्ड, गडगेवाडी, आंगडीवाडी, बळवंत नगर*४४२*२११
२०९*सटमटवाडी*२७१*७९
२१०*निमजगा, गवळीटेंब, शेटकरवाडी, गणेशनगर, पानवळ*५२१*१८८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com