पीएनजीतर्फे पर्यावरणदिन अभिनव पद्धतीने साजरा

पीएनजीतर्फे पर्यावरणदिन 
अभिनव पद्धतीने साजरा

88488

‘पीएनजी’तर्फे पर्यावरण दिन
अभिनव पद्धतीने साजरा

चिपळूण, दि. ५ : पीएनजी सराफी पेढीतर्फे ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यादिवशी पीएनजीच्या महाराष्ट्र व कर्नाटक मधील सर्व शाखांमध्ये आलेल्या ग्राहकांना छोटेसे रोप भेट देण्यात आले आणि त्या रोपाचे संवर्धन व संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्णयानुसार १९७३ पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. वृक्षतोड, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, लोकसंख्या वाढ, सागरी प्रदूषण, वन्यजीव गुन्हेगारी, प्लास्टिक प्रदूषण यांसारख्या अनेक पर्यावरणीय समस्यांवर या दिवशी जनजागृती केली जाते. पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले जाते. मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीने (पीएनजी) स्थापनेपासून म्हणजेच १८३२ पासून सामाजिक बांधिलकीची दृष्टी ठेवली आहे. व्यवसायामध्ये सातवी पिढी कार्यरत असली तरी सामाजिक बांधिलकीचे बाळकडू प्रत्येक पिढीने जपले आहे. व्यावसायिक मूल्ये जपत दुसरीकडे वेळोवेळी सामाजिक बांधिलकीही पेढीने जपली आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पीएनजी पेढीने अनोखा उपक्रम संचालक सिद्धार्थदादा गाडगीळ यांच्या संकल्पनेतून साजरा केला. आज पीएनजी पेढीत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना छोटेसे रोप देण्यात आले. हा उपक्रम पेढीच्या महाराष्ट्रातील आठ आणि कर्नाटकातील तीन अशा सर्व शाखांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने पार पाडला.
--
‘आपले पर्यावरण, आपली जबाबदारी’
मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी (पी. एन. जी.) यांच्या वतीने सतत पर्यावरण संरक्षण आणि जागृतीचे काम केले जाते. सांगली शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्ष लागवड व संगोपनासाठी या पेढीने ८०० ट्री गार्ड पुरविले आहेत. ‘आपले पर्यावरण आपली जबाबदारी’, हे बोधवाक्य घेऊन वृक्ष लागवड आणि संवर्धन व्हावे, यासाठी या वृक्षांना नियमित पाणी देण्यासाठी पी. एन. जी.ने स्वतंत्र टँकरची व्यवस्था देखील केली आहे. या उपक्रमाची सुरुवात जानेवारी २०२० पासून झाली आहे. या उपक्रमाचे उद्‌घाटन पी. एन. जी.चे संचालक सिद्धार्थ गाडगीळ आणि तत्कालीन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते झाले होते. पीएनजीच्या या उपक्रमामुळे सांगली शहरात शेकडो वृक्षांची लागवड केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com