नारुर येथे रविवारी बीजरोपण उपक्रम

नारुर येथे रविवारी बीजरोपण उपक्रम

नारुर येथे रविवारी बीजरोपण उपक्रम
सिंधुदुर्गनगरी, ता. ७ ः जंगली जनावरांना त्यांच्या हक्काच्या जंगलातच पुरेसे खाद्य उपलब्ध व्हावे व माणूस आणि जंगली जनावरांतील संघर्ष कमी व्हावा, या उद्देशाने रांगणा बीजरोपण उपक्रमांतर्गत रांगणाच्या जंगलात बिया पेरण्याचा कार्यक्रम रविवारी (ता.९) आयोजित केला आहे. निसर्गप्रमी डॉ. बापू भोगटे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या उपक्रमाचे हे सलग नववे वर्ष असून या उपक्रमात वनखात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी सहभागी होणार आहेत. या उपक्रमांतर्गत नारुरपासून सुरू होणाऱ्या व थेट रांगणागडाच्या कड्यांना भिडणाऱ्या घनदाट जंगलात रांगणाच्या पायथ्यापासून ते थेट गडाच्या दरवाजापर्यंत दोन्ही बाजूने विविध फळांच्या बिया पेरल्या जातात. एवढेच नव्हे, तर सोबत वड, पिंपळ, पायर अशा वृक्षांची रोपे लावली जातात. नव्या पिढीला जंगलांकडे नेण्यासाठी आणि त्यांच्यात निसर्गभ्रमंतीची आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला जातो. जंगलात जर खाण्यायोग्य काही असेल तर जंगली जनावरे जंगलातच स्थिरावतील. त्यामुळे माणूस आणि जनावरे यांच्यातील संघर्ष कमी होईल. त्यामुळे फळझाडे जंगलात निर्माण व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेत निसर्गासाठी आपले योगदान दिले आहे. रविवारी या बीजरोपण उपक्रमात जिल्हाभरातून अनेकांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. सकाळी ७ वाजता नारुर येथील रांगणागडाच्या पायथ्याच्या प्रवेशद्वारापाशी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. भोगटे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com