विजेच्या धक्क्याने कर्मचारी जखमी

विजेच्या धक्क्याने कर्मचारी जखमी

88746

विजेच्या धक्क्याने कर्मचारी जखमी

सावंतवाडीतील घटना ः महावितरणच्या कारभाराबाबत संताप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः शहरात विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक विजेचा धक्का बसल्याने कर्मचारी खाली कोसळून जखमी झाला. घननिल मिशाळ असे त्याचे नाव आहे. ही घटना आज दुपारी येथील मच्छी मार्केट परिसरात घडली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, घननिल मिशाळ हे शहरात महावितरणचे कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देत आहेत. आज दुपारी ते मच्छी मार्केट परिसरातील एका खांबावर काम करत होते. काम करत असताना त्याला अचानक विजेचा धक्का बसला व तो खाली कोसळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
बांद्यातही काल अशाप्रकारे काम करत असताना कर्मचारी जखमी झाला होता. दरम्यान, आज जिल्हा नियोजन सदस्य तथा कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी दोन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. त्यांनी तेथे उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खडेबोल सुनावले. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमोर जिल्हा नियोजन बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे श्री. सावंत म्हणाले. यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाकडून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून दक्षता घेऊ व निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
--
अधिकाऱ्यांविरोधात वाढत्या तक्रारी
जिल्ह्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे वित्त व मनुष्यहानी होत आहे. याला सर्वस्वी जबाबदार महावितरणचे स्थानिक अधिकारी आहेत‌. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com