मुसळधार पावसाने
मुणगेला झोडपले

मुसळधार पावसाने मुणगेला झोडपले

मुसळधार पावसाने
मुणगेला झोडपले

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ८ ः येथील परिसरात मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या आगमनामुळे शेतकरीराजा सुखावला असून, शेतीच्या कामास सुरुवात केली आहे. आबा हंगाम संपताच मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर निसर्गाने आपले काम चोखपणे बजावले आहे.
शुक्रवारी (ता. ७) मृग नक्षत्राने पावसाळ्याला सुरुवात झाली. तत्पूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी त्रेधातिरपीट उडविली होती. बळीराजा नवनवीन भात बियाणी, खते खरेदी करून आकाशाकडे डोळे लावून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता. त्यातच वातावरणात वाढलेला उष्मा, ढगाळ वातावरण यामुळे जिल्हावासीयांचा जीव हैराण झाला होता. रात्रीच्यावेळी खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे जिल्हावासीयांचा जीव कासावीस होत होता. मृगाच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी सकाळपासूनच शेतामध्ये नांगरणी करून तरवा पेरणीस सुरुवात केली. दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दिवसभरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नाराजी व्यक्त होत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com