-६४व्या वर्षी पदवी परीक्षा

-६४व्या वर्षी पदवी परीक्षा

-rat८p१८.jpg-
P२४M८८७८२
अंगणवाडीताई आशा वासुरकर.
--------------

वासुरकरांनी दिली ६४व्या वर्षी पदवी परीक्षा

धुंदरेत अंगणवाडीताईचे काम; तरुणांसमोर आदर्श
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ८ ः लांजा धुंदरे येथील आशा अशोक वासुरकर या अंगणवाडी ताईंनी ६४ व्या वर्षी पदवीची परीक्षा दिली आहे. त्यांच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अनेक तरुण-तरुणी वेळ असूनही शिक्षणापासून लांब पळतात; परंतु ज्यांना शिक्षणाची आस आहे त्यांना कोणताच अडथळा येत नाही. आपले आचारविचार चांगले बनवण्यासाठी शिक्षणाची किती गरज आहे, हे वासुरकर यांना कळले. त्यामुळेच त्यांनी ६४व्या वर्षीही पदवी पूर्ण करण्याची जिद्द धरली. त्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि परीक्षाही दिली आहे. वासुरकर यांची दोन्ही मुले आणि दोन्ही सुना शिक्षकी पेशातच आहेत. त्यांची मोठी सून ही जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तरुणांनी हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा.
लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक नंदकुमार पाटोळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com