प्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी
व्यसनमुक्तीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

प्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी व्यसनमुक्तीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

88856

प्रसिद्ध अभिनेत्री अक्षता कांबळी
व्यसनमुक्तीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

कणकवलीतील कार्यशाळेचा समारोप

कणकवली, ता. ८ : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी व्यसनमुक्तीचे कार्य, प्रचार आणि प्रसार जोमाने करण्यासाठी प्रसिद्ध मालवणी अभिनेत्री अक्षता कांबळी यांची कोकणातील व्यसनमुक्तीचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तशी घोषणा राज्याध्यक्ष वर्षा विद्या विलास यांनी आज केली.
महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या राज्यातील सर्व जिल्हा संघटक, समन्वयकांची तीनदिवसीय कार्यशाळा कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे झाली. यात आगामी वर्षभरासाठी नशाबंदी मंडळाच्या कामाची रूपरेषा यावेळी ठरविण्यात आली. या बैठकीला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र येथून नशाबंदी मंडळाचे संघटक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते अजयकुमार सर्वगोड उपस्थित होते. यावेळी नशाबंदी मंडळाच्या राज्याध्यक्ष वर्षा विद्या विलास, नशाबंदी मंडळाचे सचिव अमोल मडामे, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, नशाबंदी मंडळाच्या कोकण संघटक अर्पिता मुंबरकर, पत्रकार महेश सरनाईक आदी उपस्थित होते. नशाबंदी मंडळाच्या अध्यक्षा वर्षा विद्या विलास यांनी व्यसनमुक्ती मंडळाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी नशाबंदी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com