जगबुडीतून दिवसाला २०० ब्रास गाळ उपसा

जगबुडीतून दिवसाला २०० ब्रास गाळ उपसा

- rat८p१.jpg-
P२४M८८७६८
खेड ः जगबुडी नदीतील गाळ उपशाचे काम वेगाने सुरू आहे.
----------------

जगबुडीतून दिवसाला २०० ब्रास गाळ उपसा

दोन पोकलेनसह ६ डंपर तैनात ; राखीव भूखंडावर गाळ टाकण्याची मुभा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ८ : शहरातील जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासह बेटे काढण्यासाठी आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने २ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर होताच प्रत्यक्षात गाळ उपसण्याचे कामही हाती घेण्यात आले. अलोरे जलसंपदाच्या यांत्रिकी विभागामार्फत युद्धपातळीवर गाळ उपसण्याचे काम सुरू असून दिवसाला २०० ब्रास नदीपात्रातून गाळ उपसा केला जात आहे. यासाठी २ पोकलेनसह ६ डंपर आदी यंत्रसामुग्री तैनात करण्यात आली आहे. पाऊस पडेपर्यंत गाळ उपसण्यासह बेट काढण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.
बारमाही वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्र गाळाने वेढले आहे. याचमुळे पावसाळ्यात अतिवृष्टीदरम्याने जगबुडी पुराचे पाणी बाजारपेठेत घुसून व्यापाऱ्यांसह नदीकाठच्या रहिवाशांची कोट्यवधीची हानी होते. वर्षानुवर्षे हे चक्र कायम असल्याने व्यापाऱ्यांसह रहिवाशांवर पुराची टांगती तलवार असते. त्यामुळे जगबुडी नदीपात्रातील गाळ उपशासाठी २ कोटी ८४ लाख ९७२ रुपयांचा निधी मिळाला. हे काम अलोरे जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत २ पोकलेनच्या साहाय्याने सुरू झाले आहे. काढलेला गाळ नगरपालिकेच्या राखीव भूखंडांमध्ये टाकला जात आहे. प्रशासनाकडे रितसर पत्रव्यवहार करून ४ ते ५ भूखंडांमध्ये उपसलेला गाळ टाकण्याची मुभा दिली आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने यांत्रिकी विभागामार्फत गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील मटण-मच्छीमार्केट येथील नदीपात्राबरोबरच भरणे येथील जगबुडी नदीपात्रापासून नारिंगी नदीपर्यंत व नारिंगी नदीपासून पुढे योगिता दंत महाविद्यालयापर्यंतच्या ३ किमी अंतरापर्यंतचाही गाळ उपसण्यात येणार आहे.
----------
चौकट
पुराचा धोका टळणार

हा गाळ काढल्यामुळे खेड बाजारपेठेत भरणारे पाणी यावर्षी भरणार नाही. पुराच्या पाण्याच्या समस्येतून व्यापारीवर्गाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे, अशी प्रतिक्रिया खेड बाजारपेठेतील व्यापारी नाना गांधी यांनी दिली आहे.
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com