चोरीला गेलेल्या सोन्यापैकी अर्धा किलो सोने बनावट

चोरीला गेलेल्या सोन्यापैकी अर्धा किलो सोने बनावट

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये
अर्धा किलो सोने बनावट

श्रमिक पतसंस्था; तपासासाठी विविध पथके

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतसंस्थेची शाखा फोडणाऱ्या चोरट्यालाही बनावट सोने तारण ठेवून बॅंका, पतसंस्थांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा फटका बसला आहे. चोरीला गेलेल्या एकूण ५ किलो सोन्यापैकी अर्धा किलो सोने बनावट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.

राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतसंस्थेची शाखा फोडून सुमारे ९० लाख रुपये किंमतीचे २०० तोळेपेक्षा जास्त सोने लांबवल्याच्या प्रकार घडला होता. त्याच्या तपासासाठी जिल्हा पोलिसांनी विविधे पथके स्थापन केली आहेत. नाटे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक चोरट्यांचा शोध घेत आहेत; मात्र राजापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम व किनारपट्टीवर असलेल्या गावात हे चोरटे कसे आले, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे; मात्र स्थानिकांच्या मदतीशिवाय पतसंस्था फोडणे चोरट्यांना शक्य नसल्याने पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. पोलिसांचे एक पथक अजूनही त्या भागात कार्यरत आहे. या चोरीच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका संशयिताकडून बनावट सोनेतारणद्वारे कर्जप्रकरणे करून बॅंका, पतसंस्थांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. यामध्ये कोट्यवधीचा चुना संशयितांनी लावला. कोल्हापूर येथील सोनाराने दिल्लीतून बनावट दागिने मागवून त्यावर सोन्याचा मुलामा देऊन ही फसवणूक केली. या प्रकरणी संशयितांना अटक करून पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com