तारकर्लीत रस्ता दुरुस्तीसाठी उपोषण

तारकर्लीत रस्ता दुरुस्तीसाठी उपोषण

88925

तारकर्लीत रस्ता दुरुस्तीसाठी उपोषण

ग्रामस्थांचे आंदोलन ः १५ दिवसांत कार्यवाहीची प्रशासनाची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : नौदल दिन कार्यक्रमावेळी डांबरीकरण व सुस्थितीत केलेल्या तारकर्ली येथील रस्त्याच्या दुतर्फा जलजीवन मिशनच्या कामासाठी खोदाई करण्यात आली; मात्र चार महिने उलटले तरी रस्त्याची दुरुस्ती न केल्याने तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी ग्रामस्थांसह तारकर्ली येथील साई मंदिरनजीक उपोषण केले. या उपोषणस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजित पाटील यांनी भेट देऊन जलजीवन मिशनचे अधिकारी श्री. मेस्त्रा यांनी १५ दिवसांत रस्त्याच्या डागडुजीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देत काम पूर्ण करू, अशी उपोषणकर्ते बापर्डेकर यांना दिली. या आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले.
नौदल दिन कार्यक्रमावेळी तारकर्ली रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीने रस्त्याच्या दुतर्फा जलजीवन मिशनच्या कामासाठी खोदाई करण्यात आली. या खोदाईमुळे रस्त्याकडेच्या भागाची दुरवस्था झाली असून, यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. हा खोदाई केलेला रस्ता पंधरा दिवसांत पूर्वीसारखा सुस्थितीत करावा, अशी मागणी बापर्डेकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती; मात्र रस्त्याच्या डागडुजीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने बापर्डेकर यांनी ग्रामस्थांसह उपोषण छेडले. यावेळी त्यांच्या समवेत सरपंच मृणाली मयेकर, किशोर कुबल, तुळशीदास कोयंडे, जयवंत सावंत, गणपत मोंडकर, प्रसाद बापर्डेकर, कुणाल बापर्डेकर, प्रतीक कुबल, रामा चोपडेकर, सहदेव साळगावकर, प्रकाश बापर्डेकर, दीपक लोणे, वैभव सावंत, गीतेश बापर्डेकर, बाबू टिकम, हर्षल गंभीरराव, वैभव तळवडकर आदी उपस्थित होते.
या उपोषणस्थळी बांधकाम उपविभागाचे अभियंता अजित पाटील, जलजीवन मिशनचे अधिकारी श्री. मेस्त्री, ठेकेदार सिंगारे यांनी भेट देऊन बापर्डेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी अभियंता पाटील यांनी रस्त्याची पाहणी केली असता खोदाईमुळे रस्त्याच्या बाजूपट्ट्या खराब झाल्याचे तसेच दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त भागात खोदाई झाल्याने रस्त्याचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. पाटील यांनी तत्काळ या रस्त्याची डागडुजी १५ दिवसांत करण्याच्या सूचना जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना दिल्या. चुकीच्या पद्धतीने काम झाल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी ‘जल जीवन’ला दिल्याची माहिती बापर्डेकर यांनी दिली. पाटील यांनी रस्त्याचे काम १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने बापर्डेकर यांनी उपोषण स्थगित केले; मात्र १५ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com