विलास रहाटे यांची शिवरांगोळी प्रथम

विलास रहाटे यांची शिवरांगोळी प्रथम

कबनूरकर स्कूलमध्ये
गुणवंतांचा सत्कार
साखरपाः श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलचा शालांत परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध विषयांत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देण्यात आली. कबनूरकर स्कूलचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. सलग सहाव्या वर्षी शाळेने १०० टक्के निकाल देण्याची परंपरा राखली आहे. या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला होता. यात प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी अनुक्रमे गौरी सावंत, सृष्टी वाजे आणि भार्गवी सुर्वे यांचा संस्थाध्यक्ष श्रीधर कबनूरकर, मुख्याध्यापिका लीना कबनूरकर आणि संस्था सदस्य रमेश ढवळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध विषयात सर्वोत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यात सृष्टी वाजे हिला इंग्रजी, हिंदी आणि गणित विषयाचे, जिजा वाघधरे हिला हिंदी आणि मराठी विषयाचे, गौरी सावंत हिला मराठी, गणित, विज्ञान तसेच समाजशास्त्र या विषयांची पारितोषिके देण्यात आली.
-----------
M88977
विलास रहाटे यांची
शिवरांगोळी प्रथम
साखरपाः देवरूख येथील युवा कलाकार विलास रहाटे यांनी शिवाजी महाराजांच्या काढलेल्या पोर्ट्रेट रांगोळीला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नजीकच्या तडवळे येथील शिवराज्याभिषेक उत्सव समितीतर्फे राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत रहाटे यांनी राजांची पोर्ट्रेट रांगोळी काढली होती. ही रांगोळी परीक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तिला प्रथम पारितोषिक देण्यात आले.
---------------
परचुरी-फुणगूस रस्त्यावर
चिखलाचे साम्राज्य
संगमेश्वरः खाडी समांतर परचुरी-फुणगूस रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्याच्या झालेल्या दूरवस्थेमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत परचुरी-फुणगूस रस्त्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वीच खोदकाम पूर्ण झाले असताना देखील रस्त्याचे खडीकरणाचे काम न झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल आला आहे. प्रशासनाने लक्ष घालून ठेकेदाराकडून वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
----------
88999

हरिज्ञा शिंदे हिचा
नवकोंकणतर्फे सन्मान
चिपळूण ः दसपटीतील येथील हरिज्ञा शिंदे विशाखापट्टणम येथील नेव्हल सुरक्षा बोर्डची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिची केरळमध्ये इंडियन नेव्ही झामोरिन या ठिकाणी उच्च अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. याबद्दल नवकोंकण एज्युकेशन सोसायटी चिपळूणतर्फे नुकताच तिचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, व्हा. चेअरमन डॉ. दीपक विखारे, सचिव अतुल चितळे, नियामक समिती सदस्य सुचय रेडीज, नीलेश भुरण, फैसल कास्कर, प्राचार्य डॉ. माधव बापट आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com