काँग्रेस, शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

काँग्रेस, शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

खाडी रस्त्याच्या
साईटपट्ट्या धोकादायक
संगमेश्वर ः संगमेश्वर ते डिंगणी- फुणगूस खाडीमार्गावर साईटपट्ट्यांचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने वाहनांचे अचानक चाक साईटपट्ट्यांच्या खाली उतरते आणि गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. रस्ता अरूंद असल्याने एकावेळी एकच वाहन रस्त्यावर राहू शकते. दुसरे वाहन समोरासमोर आले तर एका वाहनाला साईटपट्ट्याच्या खाली उतरावे लागतेच तरच दोन वाहने पास होऊ शकतात. रात्रीच्यावेळी हा रस्ता खूप धोकादायक आहे. डिंगणी मार्गावर सीएनजी गॅस पॉईंट असल्याने गॅस भरण्यासाठी पर्यटक आणि इतर वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गावर जात असतात. या मार्गावरून गणपतीपुळेला जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. चिपळूणच्या दिशेने येणारे पर्यटक याच मार्गाने जात असतात. धोकादायक साईटपट्ट्या त्वरित दुरुस्त करण्यात याव्यात, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
------------
काँग्रेस, शेतकरी संघटनेचे
तहसीलदारांना निवेदन
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे शासकीय हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. हे हॉस्पिटल नूतन इमारतीत चालू करण्यापूर्वी तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी, ईसीजी, एमआरआय, डायलिसिस, रक्तपेढी, सीटी स्कॅन आदी सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी तसेच हॉस्पिटल सुसज्ज आणि अद्ययावत झाल्यावरच सुरू करण्यात यावे. यासाठी सुमारे २५ जणांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अमृता साबळे यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व अशोक जाधव यांनी केले.
--------
राज्याभिषेक सोहळ्यानंतर
रायगडावर स्वच्छतामोहीम
गावतळे ः स्वच्छ रायगड सुंदर रायगड मोहिमेने किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजकी जय, अशा जयघोषात संपूर्ण रायगड दणाणून गेला. या राज्याभिषेक सोहळ्यास महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारत देशातून लाखो शिवभक्त हजर होते. राज्याभिषेक सोहळ्याची सांगता झाल्यावर गडकिल्ले संवर्धन संस्थेतर्फे रायगडावरील होळीचे माळ, जगदिश्वर मंदिर परिसर, टकमक टोक, राजवाडा, नागारखणा या भागातील प्लास्टिक बॉटल्स तसेच कचरा उचलण्यात आला. पायवाटेने गडउतार होताना पायवाटेत पडलेला कचरा व प्लास्टिक बॉटल्स असे जवळपास २० बॅग भरून कचरा उचलून तो गडाखाली आणण्यात आला. संस्थेच्यावतीने गेली ४ वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचे आयोजन कोकण विभाग अध्यक्ष शुभम राणम, उपाध्यक्ष शुभम फाटक, अभिजित तिरलोटकर यांनी केले. मोहिमेत सायली पांचाळ, क्रांती तिरलोटकर प्रियांका झोरे, विकास सपकाळ, सतीश रानम, संदेश रानम, सौरभ मणचेकर, जीवन बराटे, गुरूनाथ काळे, सर्वेश कोकरे, अजय काळे, यशराज हेमगुदे, अजिंक्य केसकर आदींसह संस्थेचे २५ दुर्गसैनिक सहभागी झाले होते.
----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com