खेड ः वाडी मालदेतील मुख्यमंत्री ग्रामसडकच्या चौकशीची मागणी

खेड ः वाडी मालदेतील मुख्यमंत्री ग्रामसडकच्या चौकशीची मागणी

ग्रामसडक कामाच्या चौकशीची वाडीमालदेत मागणी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : तालुक्यातील नांदिवली ते वाडीमालदे या गावांदरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम सुरू असून, या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. याबाबत तातडीने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कामाची पाहणी करून ते दर्जेदार करावे व कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निवेदन देऊन केली आहे.
नांदिवली ते वाडीमालदे या गावांच्या दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १ कोटी ६ लाख ५३ हजार रुपये खर्चून रस्ता व अन्य संबंधित कामे केली जात आहेत. रस्त्याचे काम २०२३ मध्येच पूर्ण झाले आहे. हे काम सुरू असताना वेळोवेळी ग्रामस्थांनी काम निकृष्ट होत असल्याबाबत तक्रार केली होती; मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीत दगडगोटे यांचा वापर करण्यात आला आहे.
रस्त्यावरील वळण असलेल्या ठिकाणी डांबरीकरण करताना वाहनांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने काळजी घेण्यात आलेली नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होत असला तरी या मार्गावर आवश्यक तेथे पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी गटारे, मोऱ्या बांधलेल्या नाहीत. वास्तविक मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा ठेका मिळालेल्या कंपनीने या रस्त्याची व सोबत केलेल्या इतर कामांची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती ठेवायची आहे; परंतु कोणीच याकडे लक्ष देत नसल्याने या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com