सिंधुदुर्गला पावसाने झोडपले

सिंधुदुर्गला पावसाने झोडपले

सिंधुदुर्गला पावसाने झोडपले

बहुतांश भागात अतिवृष्टी; कुडाळमध्ये सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ ः सिंधुदुर्गला शनिवारी (ता.८) रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवण तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. आज सकाळपासून मात्र पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. मुसळधारेमुळे नदीनाले प्रवाहीत झाले आहेत.
जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. कुडाळ, सावंतवाडी, देवगड आणि मालवण या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. याशिवाय इतर भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पहाटेपर्यंत जोरदार पाऊस सुरू होता. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. दरम्यान, आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण होते. काही ठिकाणी हलक्या सरी पडत होत्या. आज सायंकाळी पुन्हा पावसाला सुरूवात झाली. पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. जिल्ह्याच्या सर्वच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद कुडाळ तालुक्यात १८७ मिलीमीटर इतकी झाली आहे. मालवण-१५२, सावंतवाडी-१४३, देवगड १५८, कणकवली ९८, वैभववाडी ८८ तर दोडामार्ग तालुक्यात ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
----------
चौकट
बुधवारपर्यंत अंदाज
हवामान विभागाने आज मुसळधारेचा अंदाज दिला होता. परंतु, दिवसभर तरी पाऊस झाला नाही. दरम्यान, हवामान विभागाने १२ जुनपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com