देवगड तालुक्याला 
वादळी पावसाने झोडपले

देवगड तालुक्याला वादळी पावसाने झोडपले

89114

देवगड तालुक्याला
वादळी पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ९ ः तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. जोराच्या झालेल्या पावसाने येथील साटमवाडी परिसरातील एक विहीर ढासळली. गेल्या चोवीस तासांत आज सकाळपर्यंत येथे १५८ मिलिमीटर इतका जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत तालुक्यात २७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलामीलाच पावसाने मोठी मजल मारली आहे.
तालुक्यात काल (ता. ८) दुपारपासून पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले. रात्रभर पावसाच्या सरी बरसल्या. सुरूवातीच्याच झालेल्या जोराच्या पावसामुळे येथील साटमवाडी भागातील एक विहीर ढासळली. त्याबाजूने रहदारीचा रस्ता जात असल्याने रस्त्याला संभाव्य धोका असल्याचे मानले जात आहे. याबाबत महसूल यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे. जोराच्या पावसामुळे शहरात रस्त्यावरून गटारे भरून पाणी वाहत होते. दमदार बरसलेल्या पावसाने आतापर्यंत तालुक्यात २७१ इतकी नोंद केली आहे. चोवीस तासात १५८ मिलीमीटर इतका पाऊस झाला. पावसाची सुरूवातच जोरदार झाली आहे. मात्र, आज दिवसभर पावसाने उघडीप घेतली होती. आकाशात ढग दाटून येत होते. मात्र, पाऊस झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com