आत्मसंरक्षणासाठी कराटे कला आवश्यक

आत्मसंरक्षणासाठी कराटे कला आवश्यक

89179

आत्मसंरक्षणासाठी शिका कराटे कला

दत्तात्रय मारकड ः तोंडवली-बोभाटेवाडीत संस्कार वर्गाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १० ः ‘‘मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी आणि आत्मसंरक्षणासाठी ज्युदो कराटे व तायक्वांदोसारखी कला आत्मसात करणे आवश्यक आहे. निरोगी शरीर, स्वयंशिस्त आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल आर्टची कला आत्मसात करायला हवी,’’ असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो व कराटे असोसिएशनचे सचिव तथा कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड यांनी तोंडवली-बोभाटेवाडी येथे केले.
तोंडवली ग्रामस्थांतर्फे बोभाटेवाडी हनुमान मंदिरमधील कराटे व संस्कार वर्गाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. कराटे स्वसंरक्षण आणि संस्कार वर्गाचे उद्‍घाटन सिंधुदुर्ग जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी एकनाथ धनवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी तोंडवली पोलिसपाटील विजय मोरये, यशवंत सदडेकर, प्रमुख अतिथी संजय पाताडे (कासार्डे), शशांक तळेकर व नीलेश तळेकर (तळेरे), वैशाली सदडेकर, साक्षी नाडकर्णी, तन्वी मेस्त्री, मयुरी बोभाटे, तुकाराम मोरये, दिगंबर साळुंके, अंबरनाथ साळुंके, विजय मोरये, बाळा बोभाटे, मधुकर बोभाटे, मयुरी बोभाटे, सानिका बोभाटे, ज्योती भाट, मानसी बोभाटे, मंगला मोरये, सिद्धी सांळुके, तन्वी मेस्त्री, गीता सांळुके, सुनंदा सांळुके, श्वेता साळसकर, सरिता साळसकर, दीपाली शिरसाट, सुरेखा बोभाटे आदी उपस्थित होते. सुषमा सावंत यांनी प्रास्ताविकात दोन्ही वर्गांचे विशेष महत्त्व स्पष्ट करून अधिकाधिक मुला-मुलींना या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अंगणवाडी सेविका ज्योती भाट यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
---
प्रत्येक शनिवारी, रविवारी प्रशिक्षण
श्री. धनवटे यांनी मार्शल आर्टच्या प्रशिक्षणातूनच मुला-मुलींना मानसिक, बौद्धिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जाते, असे सांगितले. तोंडवली हनुमान मंदिरात प्रारंभ झालेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला तोंडवली व परिसरातील बहुसंख्य मुले-मुली उपस्थित होत्या. हा प्रशिक्षणवर्ग प्रत्येक शनिवार आणि रविवारी सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com