स्पर्धा परीक्षांतही कोकण अव्वल बनवा

स्पर्धा परीक्षांतही कोकण अव्वल बनवा

89186

स्पर्धा परीक्षांतही कोकण अव्वल बनवा

विकास सावंत ः सावंतवाडीत ‘आरपीडी’ प्रशालेतर्फे गुणगौरव सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः भविष्यातील ध्येयनिश्चिती विद्यार्थ्यांनी आजच करावी. आजच्या काळात अनेक शैक्षणिक सोयी सुविधा, संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी, पालकांनी जागृत राहून या संधींचा फायदा घेतला पाहिजे. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच कारकीर्द घडवून आयुष्य सुखी बनवा. गुणवत्तेत कोकण विभागाचा दबदबा आहे, असेच यश स्पर्धा परीक्षांमध्येही मिळवा, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांनी केले.
आर. पी. डी. हायस्कूल व ज्यु. कॉलेजमधून मार्च २०२४ च्या एस.एस.सी. व एच.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्था उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, संचालक चंद्रकांत सावंत, संदीप राणे, वसुधा मुळीक, सोनाली सावंत तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड, उपमुख्याध्यापक पी. एम. सावंत, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक संप्रवी कशाळीकर आदी उपस्थित होते.
प्रशालेत उच्च माध्यमिक विभागात तालुक्यात प्रथम (विज्ञान शाखा) आलेला राहुल गावडे, प्रशालेत द्वितीय आलेला पार्थ राऊळ, संयुक्तपणे तृतीय श्रावणी रासम व सलोनी कोटकर, वाणिज्य शाखेचे गोविंद भांगले, धनेश नाईक, आर्या कुडतरक, कला शाखेचे अनुक्रमे खुशी रेडकर, स्नेहल गावडे, सेजल नाईक. व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातून प्रथम नीलेश सावंत, वासुदेव गावडे, दर्शन राऊळ. माध्यमिक विभाग दहावीतून सिद्धी राऊळ, कुणाल हरमलकर, संयुक्त तृतीय पवित्रा मसुरकर व वेदा कोळंबेकर यांच्यासह शालेय गुणवत्ता यादीतील आदित्य परब, पार्थ कार्लेकर, अनुष्का लोधी, समृद्धी सारंग, आर्यन धोंड, बाळकृष्ण परब, श्रेयस केनवडेकर, कुशाली गुरव, श्रीश नार्वेकर, मिहिर मराठे, सानिका लांबर, पूनम नाईक, विजय गावडे, श्रेयस गावडे, आकांक्षा राऊळ, मंथन गवस, सुकन्या पास्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकांच्यावतीने प्रशांत राऊळ व प्रवीण परब यांनी, विद्यार्थ्यांमधून वैष्णवी भांगले, राहुल गावडे व कुशाली गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री. धोंड यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com