विविध मागण्यांसाठी
प्राथमिक शिक्षकांचे धरणे

विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचे धरणे

विविध मागण्यांसाठी
प्राथमिक शिक्षकांचे धरणे
सिंधुदुर्गनगरीत आंदोलन ः प्रशासनाचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले.
गणित व विज्ञान पदवीप्राप्त उपशिक्षकांना पदवीधर शिक्षकपदी पदोन्नती देण्यासाठी अंतिम सेवाज्येष्ठता यादीतील उपशिक्षकांचे प्रस्ताव सादर केलेले असून, अद्याप त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही. ही रखडलेली प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी. विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया रखडलेली आहे तीही राबविण्यात यावी. इतर जिल्ह्यांतील आंतरजिल्हा बदलीस पात्र उमेदवारांना त्या-त्या जिल्हा परिषदेने कार्यमुक्त करण्यात आलेले आहे, तरी आपल्याही जिल्हा परिषदेनेही पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करावे. आंतरजिल्हा बदलीने स्व-जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांची पीएफ रक्कम अद्याप त्यांच्या खाती वर्ग केलेली नाहीत, ती लवकरात लवकर वर्ग करण्यात यावीत, तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी रक्कम शिक्षकांच्या खाती वर्ग करण्यात यावी, या मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सिंधुदुर्ग संघटनेचे अध्यक्ष गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संघटनेचे सुनील करंडे, आनंद तांबे, रुपेश परब, निंगोजी कोकितकर, रुपेशकुमार गुंजाळ, वल्लभानंद प्रभू, प्रतिभा भोयर, सरिता परब आदी उपस्थित होते.

८९२३०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com