रत्नागिरीच्या दत्तात्रय साळी यांना ऊर्जाशिरोमणी पुरस्कार

रत्नागिरीच्या दत्तात्रय साळी यांना ऊर्जाशिरोमणी पुरस्कार

दत्तात्रय साळींना ऊर्जा शिरोमणी पुरस्कार
‘महावितरण’ कोकण परिमंडळ; वार्षिक ऊर्जा पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः कोकण परिमंडळ ‘महावितरण’चा १९ वा वर्धापन दिन उत्साहात झाला. वार्षिक ऊर्जा पुरस्काराचे वितरण मुख्य अभियंता परेश भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाचा ‘ऊर्जा शिरोमणी’ पुरस्कार रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी यांना प्राप्त झाला.
रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहात वर्धापन दिन कार्यक्रम झाला. या प्रसंगी अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीयांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर (रत्नागिरी), विनोद पाटील (सिंधुदुर्ग), अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) कल्पना पाटील, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते. वर्षभरातील कार्य आणि विविध कामांच्या परीक्षणात पात्र ठरलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ऊर्जा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये क्रीडारत्न ः परीक्षित शिंदे (कबड्डी). ऊर्जारत्न पुरस्कार ः परीक्षित उदगावे (उपकार्यकारी अभियंता, रत्नागिरी परिमंडळ), गणेश कोदे (चाचणी विभाग रत्नागिरी), सचिन म्हेत्रे (मालवण), शरदकुमार संकपाळ (राजापूर-२), नीलेश पाटील (वैभववाडी), सचिन पाटणकर (चिपळूण), राम कावळे (मंडणगड), उपव्यवस्थापक वित्त व लेखा सुनील गोसावी व राकेश रूके (सिंधुदुर्ग व खेड), सहायक लेखापाल ः कुणाल शेसवारे (रत्नागिरी), रश्मी चव्हाण (सावर्डे). ऊर्जाभूषण पुरस्कार (अभियंता संवर्ग) ः मंदार ताटके (सहायक अभियंता, रत्नागिरी), स्वप्नील उमरीकर (देवगड), साईनाथ भाये (शिरगाव), दीपक मुगडे (शिरगाव), सावळाराम पेडणेकर (रेडी), शंतनु कांजळकर (आंबवली), किशोर मर्डेकर (खारेपाटण), सुमित्रा यादव (पालशेत), विशाल शिंदे (मंडणगड), वैभव मोडक (रत्नागिरी-३), संदेश गुरव (मालगुंड). कनिष्ठ अभियंता ः सुप्रिया कारंडे (सावर्डे), मानवसंसाधन लिपीक संवर्ग ः विकास थोरवत (चिपळूण), विनायक नाटेकर (खेड), केतन घाडी (कणकवली), रिया परब (कुडाळ). लेखा लिपीक संवर्ग ः श्रावणी सप्रे (लांजा), श्वेता आठल्ये (चिपळूण शहर), नचिकेत चक्रदेव (मंडणगड), नेहा शिंदे (दापोली-२), प्रिया अवसारे (कणकवली), रामचंद्र परब (कणकवली), सुंदर राऊळ (सावंतवाडी), प्रिया तानावडे (कुडाळ). तंत्रज्ञ संवर्ग ः धनाजी पवार (खेर्डी), अरुणा कदम (पिंपळी), अंकिता होडे (शिरगाव), झिमू झोरे (दापोली), संजय गायकवाड (देवगाव), गुरुनाथ उंदरे ( खेड), अजय चव्हाण (पावस-१), कृष्णा बेंडल (देवरूख), मोहन जाधव (कुरधुंडा), दीपक शिरकर (तळेरे), जानू पंढरमिसे (आचरा), कमलाकर गोसावी (आचरा), प्रसाद सावंत (बांदा-१), मनोज सावंत (सासोली), किशोर मोरे (वेंगुर्ला शहर). यंत्रचालक संवर्ग ः राजेश शिंदे (चिपळूण शहर), राजेंद्र जाधव (दापोली), महेंद्र पारकर (चांदोर), भरत वेंगुर्लेकर (चिपळूण शहर), शरद परब (ओरस).

89213

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com