नासाचे अंतराळ केंद्र पाहून विद्यार्थी भारावले

नासाचे अंतराळ केंद्र पाहून विद्यार्थी भारावले

- rat१०p१९.jpg-
२४M८९२३३
अमेरीकेतील नासा येथील अंतराळ संशोधन केंद्रातील प्रतिकृती पाहणारे विद्यार्थी.
- rat१०p२०.jpg-
P२४M८९२३४
नासा दौऱ्यावर असेलेले रत्नागिरीतील जिल्हा परीषद शाळांमधील विद्यार्थी.
-------------
नासाचे अंतराळ केंद्र पाहून विद्यार्थी भारावले

वीस जणांचा दौरा ; जंबो जेटसह अंतराळवीरांशी संवादाची साधनेही पाहिली

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः अंतराळ संशोधनात अग्रेसर असलेल्या अमेरिकेमधील नासा केंद्रातील अंतराळातील विश्वाची अनुभूती रत्नागिरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील २० विद्यार्थ्यांना घेतली. पहिल्या दोन सत्रात विद्यार्थ्यांना अंतराळ मोहीम कशी राबवली जाते, जंबो जेट, रॉकेटचे डिझायनिंग, कोडिंग आणि अंतराळवीरांशी संवाद साधणे यासह अवकाशातील गमतीजमती जाणून घेता आल्या. नासाचे केंद्र पाहून ग्रामीण भागातील विद्यार्थी भारावून गेले.
जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी आणि भविष्यात एखादा संशोधक घडवावा या उद्देशाने सलग दुसऱ्या वर्षी नासा (अमेरिका) येथे सफर घडविण्यात आली. ९ जुनला हे सर्व विद्यार्थी अमेरिकेला रवाना झाले होते. त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद अधिकारी, शिक्षक सहा जणांची टिम विद्यार्थ्यांसोबत आहे. नासा केंद्राला भेट दिल्यानंतर स्पेस कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना नेण्यात आले. स्पेस सेंटर, ह्युमन मुन २, नासा मिशन कशी राबविली जाते याची माहिती, शटल प्रक्षेपण, स्मिथ रोनियन म्युझियम, चौदा विविध संशोधन केंद्र, अंतराळ संशोधनाविषयक शैक्षणिक मॉडेल्स, आयमॅक्स थ्री डी इफेक्ट अशा ठिकाणी या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. फ्लाइट सिम्युलेशन, एअरोनॉटिक्स, मॉडेल रॉकेट लॉँचिंग, मूनवॉक, रॉकेट डिझायनिंग, अंतराळवीरांशी संवाद, तज्ज्ञांची व्याख्याने आदींबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. अंतराळात जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या स्पेसची प्रतिकृती पाहून विद्यार्थी भारावून गेले. हा दौरा १७ जूनपर्यंत आहे. या कालावधीत हे विद्यार्थी संपूर्ण नासाची माहिती घेणार आहेत.
-----
चौकट
नासाच्या भेटीला वीस विद्यार्थी
जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओम शैलेश कोबनाक, आक्षा संदीप आग्रे (मंडणगड), मानिनी मंगेश आग्रे, शुभम जयंत जोशी (दापोली), सार्थक प्रकाश महाडिक , किर्ती केशव मुंढे (खेड), दक्ष दिनेश गिजये, इच्छा सीताराम कदम (चिपळूण), विराज विष्णू नाचरे, पूर्वा उमेश जाधव (गुहागर), प्रसाद सतीश धामसेकर, स्वराज दिलीप पाक्तेकर, सिद्धी भिमराव पाटील (संगमेश्वर), ऋषभ गौतम गायसमुद्रे, श्रेया संदीप आग्रे (रत्नागिरी), प्रणव लक्ष्मण कोलगे, सुमेध सचिन जाधव (लांजा), जस्लिन फय्याज हाजू, शर्वरी सुघोष काळे, शमिका संतोष शेवडे (राजापूर) यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com