विजेचा धक्का बसून
कणकवलीत बैल ठार

विजेचा धक्का बसून कणकवलीत बैल ठार

विजेचा धक्का बसून
कणकवलीत बैल ठार
कणकवली ः येथील शिवाजीनगर गल्ली नं. १ मधील अनिल म्हाडगूत यांच्या घरानजीक असलेल्या पथदीप खांबाशी संपर्क झाल्याने विजेचा धक्का लागून १ बैल ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. सोमवारी सकाळी परिसरातील एका नागरिकाला बैल निपचित पडलेल्या स्थितीत दिसला. त्याने काठी घेऊन बैलाला उठविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या नागरिकालाही विजेचा किरकोळ धक्का बसल्याचे जाणवले. पाहणीअंती खांबाचा डीपी उघडा असल्याचे निदर्शनास आले. नगरपंचायत कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याच परिसरात एक स्कूल असून प्राथमिक शाळा नं. ५ चे विद्यार्थिही या मार्गाने ये-जा करत असतात. सकाळच्या सत्रात या रस्त्याने ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांचीही संख्या मोठी असते. त्यामुळे बिघाड दूर करावा व सर्व पथदीप खांबांची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
--------------
89348
उपप्रादेशिक परिवहन
अधिकारीपदी काळे
ओरोस ः सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विजय काळे यांनी पदभार स्वीकारला. हा पदभार अनेक वर्षांपासून नंदकुमार काळे यांच्याकडे होता. नव्याने पदभार स्वीकारलेले काळे हे जालना येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते २०१६ मध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले.
----
जिल्हा प्रशासनाची
तळाशिलला भेट
मालवण ः तळाशिल खाडीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांची होडी दुर्घटनाग्रस्त होऊन तिघे मच्छीमार खाडीपात्रात फेकले गेले होते. यात दोघेजण बेपत्ता झाले होते, तर एक मुलगा पोहत किनाऱ्यावर सुखरुप पोहोचला होता. बेपत्ता एकाचा मृतदेह सापडला. तर दुसरा बेपत्ताच आहे. त्याचा खाडीपात्रात शोध सुरू आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे व जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सर्जेकोट जेटी येथे भेट दिली. प्रशासकीय यंत्रणांना बेपत्ता मच्छीमाराचा शोध घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
--------------
वृक्ष बॅंकेतर्फे
रोपांचे वाटप
कणकवली ः नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृक्ष बँकेची स्थापना करण्यात आली आहे. कणकवली शाखेच्यावतीने तालुक्यात ठिकठिकाणी नागरिकांना वृक्षांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. जिल्ह्यात बापू परब आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या मार्गदर्शनातून कणकवली तालुक्यातही वृक्ष बँक स्थापन करण्यात आली आहे. या बँकेच्या माध्यमातून तालुक्यात ठिकठिकाणी नारळ, सुपारी झाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक पंढरी जाधव, तालुकाध्यक्ष अतुल दळवी, मयूर ठाकूर आदी उपस्थित होते. बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकाणी वृक्षांच्या रोपांचे वाटप केले जाणार आहे.
---------------
बावळाट-फौजदारवाडीत
सत्संग मठाचे उद्‍घाटन
ओटवणे ः ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ती संस्थेतर्गत बावळाट-फौजदारवाडी येथे नव्याने साकारलेल्या सत्संग मठाचा उद्घाटन सोहळा उत्साहात झाला. संत सद्गुरू आनंदी गुरुजी यांच्या उपस्थितीत दाणोलीचे सेवानिवृत पोस्ट मास्तर भास्कर परब यांच्या हस्ते मठाचे उद्घाटन झाले. आनंदी गुरुजींनी संतश्रेष्ठ वाणीवर सत्संग प्रवचन केले. व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्य बरबाद करू नका, जे आपल्याला मिळाले त्यात समाधान माना, असा उपदेश केला. जीवनात माणसाने देहाला कमी लेखू नये, असे सांगत संत सद्गुरू आनंदी गुरुजींनी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com