संगमेश्वर-३५ गावे पूरग्रस्त, २८ गावे दरडप्रवण घोषित

संगमेश्वर-३५ गावे पूरग्रस्त, २८ गावे दरडप्रवण घोषित

३५ पूरग्रस्त तर, २८ गावे दरडप्रवण घोषित
संगमेश्वरचा आपत्ती आराखडा; धोकायदायक ठिकाणच्या लोकांना स्थलांतराच्या सूचना
सकाळवृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ः पावसाळ्यात ओढावणाऱ्या आपत्तीकाळात उपाययोजना राबवण्याच्यादृष्टीने संगमेश्वर तालुक्याचा आपत्ती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार ३५ गावे संभाव्य पूरग्रस्त असून, २८ गावे दरडप्रवण म्हणून घोषित केली आहेत.
तालुक्यात नदीकिनारी असणारी ११ गावे, खाडीकिनारी असणारी १० गावे आणि धरणाच्या क्षेत्रात असणारी १४ गावे अशी ३५ गावे संभाव्य पूरग्रस्त गावे निश्चित केली आहेत. या ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाल्यास तेथील ग्रामस्थांना जवळच्या शाळा, समाजमंदिर या ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित करण्याची सोय करण्यात आली आहे तसेच पोहणाऱ्या नागरिकांची यादी तयार करण्यात आली आहे तसेच ७ लाइफजॅकेट, १२ लाइफबोया, रोप, टॉर्च आणि पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टिम, ऑनलाइन सूचना करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पूरग्रस्त गावांप्रमाणे २८ गावे दरडप्रवण गावे आहेत. सुमारे ३ हजार लोकांना याचा धोका उद्भवू शकणार असल्याचा संभव आहे. ज्या गावांना पुराचा अधिक धोका आहे तेथील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीस देण्यात आल्या आहेत तसेच खाडीकिनारी असणाऱ्या गावांनाही सतर्कतेच्या आणि स्थलांतराच्या नोटीस देण्यात आली आहे. याबरोबरच आपत्तीकक्ष २४ तास तैनात ठेवण्यात येणार आहे. कुठेही झाड मार्गावर पडले तर ते हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज आहे. त्याचबरोबर मदतकार्यासाठी हेल्प अॅकॅडमीही सज्ज राहणार आहे.

चौकट
संभाव्य पूरग्रस्त गावे
नावडी, लोवले, कुरधुंडा, वांदी, आंबेड बुद्रुक, कोळंबे, कसबा, माखजन, कोंडगाव, ओझरे बुद्रुक, कासे, असावे, कळंबुशी, सरंद, करजुवे, मुरडव, आरवली, बुरंबाड, कोंडिवरे, कुंभारखाणी बुद्रुक, कुचांबे, कुटगिरी, राजिवली.

चौकट
दरडप्रवण गावे
ओझरे बुद्रुक, निनावे, निवधे, बामणोली, कसबा, आंगवली, मुर्शी, दख्खिन, कोळंबे, नायरी, अणदेरी, तळे, शृंगारपूर, तिवरे घेराप्रचितगड, पुर्येतर्फ देवळे, कुळ्ये, देवळे, कातुर्डी कोंड, मलदेवाडी, वांद्री, कांटे, कोंढूण आणि किरडवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com