राजापूर आयटीआयमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू

राजापूर आयटीआयमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू

चिपळुणात १२५७ मुले
करणार श्री गणेशा
चिपळूण : यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू होत आहे. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित अशा एकूण ३९७ शाळांमध्ये १ हजार २५७ मुले आपल्या शिक्षणाचा श्री गणेशा करणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी या मुलांचे सर्वच शाळांमध्ये ढोलताशा वाजवून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाते. नवीन येणाऱ्या मुलांना शाळेत उत्साह आणि आनंद वाटावा, असा उद्देश आहे. काही मुले पहिल्या दिवशी शाळेत येताना थोडीशी गोंधळलेली असतात. शाळेतील वातावरण त्यांच्यासाठी नवे असते. या मुलांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सज्ज आहे.
-------
राजापूर आयटीआयमध्ये
प्रवेशप्रक्रिया सुरू
राजापूरः येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ११ जुलैपर्यत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशअर्ज सादर करावेत, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. या ठिकाणी मेकॅनिकल डिझेल ४८ जागा, शीटमेटल वर्कर २०, ड्रेस मेकिंग २० हे एक वर्ष कालावधीचे व्यवसाय आहेत. दोन वर्ष कालावधीकरिता वीजतंत्री २०, इलेक्ट्रॉनिक्स् मेकॅनिक २४, प्रशितन व वातानुकूलित टेक्निशियन २४ या व्यवसायाकरिता शैक्षणिक पात्रता ही १०वी पास आहे. या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेशप्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन करण्यात येईल. त्यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.
------
जिजाऊ ब्रिगेडमार्फत
शिवराज्याभिषेक सोहळा
चिपळूण : चिपळूण जिजाऊ ब्रिगेड यांच्यामार्फत शहरातील सकल मराठा क्रांती कार्यालय येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज व शिवस्वराज्य प्रतिमेला अभिवादन केले तसेच जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या मुंबई कोकण उपाध्यक्षा मालती पवार, जिल्हाध्यक्ष स्नेहल चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्षा रवीना गुजर, शहराध्यक्षा वर्षा खटके यांच्यासह शिवानी भोसले, पूर्वा आयरे, नेत्रा पाटील, विभावरी जाधव, रोहिणी मोरे, अर्चना पालांडे आदी उपस्थित होत्या. शहराध्यक्षा वर्षा खटके, नेत्रा पाटील व विभावरी जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाविषयी माहिती दिली. रोहिणी मोरे यांनी संघटनेतील जिजाऊंचे कौतुक केले.
--------
देवरूख शहराचा
पाणीपुरवठा नियमित
देवरूखः संगमेश्वर तालुक्यात पाऊस सुरू झाल्याने देवरूख शहराचा पाणीपुरवठा नियमित झाल्याची माहिती मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी दिली. यापूर्वी शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने ११ एप्रिलपासून शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात होता. यामुळे नागरिकांची थोडी गैरसोय झाली होती. हा पाणीपुरवठा कायम ठेवून नागरिकांना दिलासा दिला होता. अन्यथा देवरूखवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागली असती. दोन दिवसांपूर्वी पाऊस सुरू झाल्याने पाणी साठवणाऱ्या धरणात पाण्याची वाढ झाली आहे. यामुळेच एक दिवसाआड पाणी पुरवण्याचा निर्णय बदलून नियमित पाणीपुरवठा सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com