वैभववाडीत वीजपुरवठा सुरळीत करा

वैभववाडीत वीजपुरवठा सुरळीत करा

89391

वैभववाडीत वीजपुरवठा सुरळीत करा

ठाकरे शिवसेना ः महावितरणला निवेदन; आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे तालुक्यात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून व्यापाऱ्यापर्यंत सर्वच हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरणला आज दिला.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीजप्रवाह सतत खंडित होत आहे. काही भागात रात्रभर वीजपुरवठा बंद असतो. यासंदर्भात आज ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, ठाकरे युवा सेनेचे स्वप्नील धुरी, अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष रजब रमदुल, सुनील कांबळे, रवींद्र मोरे, गणेश पवार, शंकर कोकरे आदी पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता यांची भेट घेतली. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पाढाच कार्यकर्त्यांनी वाचला. वेळोवेळी मागणी करूनही कोणतीही कामे पावसापूर्वी केलेली नाहीत. त्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. येत्या आठ दिवसांत तालुक्यातील सर्व गंजलेले विद्युत खांब बदलावेत, विद्युत वाहिन्यांवरील झाडी तत्काळ हटविण्यात यावी. जीर्ण वाहिन्या बदलाव्यात, उच्च क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर बसवावे. अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कायमस्वरुपी वायरमन द्यावा, यांसह विविध मागण्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी महावितरणला दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com