सवतसडा धबधबा रस्त्याची दुरुस्ती करा

सवतसडा धबधबा रस्त्याची दुरुस्ती करा

‘सवतसडा धबधबा
रस्त्याची दुरुस्ती करा’

चिपळूण ः तालुक्यातील पेढे येथील मुंबई-गोवा महामार्गावरील पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या सवतसडा धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. पावसाळी पर्यटनाचे दिवस सुरू होणार असल्याने या रस्त्याची साफसफाई करावी व रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष अॅड. गुरूनाथ नागे यांनी केली आहे. महामार्गाच्या कामात सवतसडा धबधब्याचा रस्ता बदलण्यात आला; मात्र तो बदलताना अद्याप दुसरा सुस्थितीतील पर्यायी रस्ता येथे करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथे काँक्रिटचा रस्ता तयार करावा. महामार्गालगत असलेल्या या धबधब्याकडे पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे पार्किंगचे योग्य नियोजन केल्यास वाहतूककोंडी आणि अपघात होणार नाहीत. सध्या या रस्त्यावर झाडेझुडपे वाढली आहेत. पावसाळी पर्यटन सुरू होणार असल्याने या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडेझुडपे तोडून रस्त्याची साफसफाई करावी, अशी मागणी नागे यांनी केली आहे.
----------------------

ठाकरे शिवसेनेतर्फे उद्या
गुणवंतांचा गौरव

लांजा ः शिवसेना व युवा सेना लांजा तालुका (ठाकरे गट) यांच्यावतीने १३ जूनला दुपारी १ वा. गणेश मंगल कार्यालय येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी, बारावीत तालुक्यात तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. आमदार राजन साळवी, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, महिला तालुका संघटक लीला घडशी आदी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व पालक, शिक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद माने यांनी केले आहे
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com