सैतवडे, जांभारीत विजेचे लपंडाव

सैतवडे, जांभारीत विजेचे लपंडाव

सैतवडे, जांभारीत विजेचे लपंडाव

रत्नागिरी, ता. ११ ः वाटद येथील महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलल्या दुर्लक्षामुळे सैतवडे, जांभारीत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
वाटद महावितरणच्या कार्यक्षेत्रात जयगड पंचक्रोशीतील गावांचा समावेश आहे. मान्सूनपूर्वी महावितरण विभाग पावसाळ्यात विजेची अडचण होऊ नये म्हणून नादुरुस्त विजेचे खांब बदलणे, विजेच्या तारांना होणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, डीपीची देखभाल करणे अशी कामे हाती घेतात. वाटद येथील महावितरण विभागातील अधिकारी-कर्मचारी याबाबत अनभिज्ञ होते. आता पावसाळा सुरू झाल्याबरोबर सैतवडे, जांभारी परिसरातील ग्रामस्थ विजेच्या लपंडावाने त्रस्त झाले आहेत. जांभारी गावात तर चार दिवस डीपी बंद पडल्याने वीज नव्हती तसेच सैतवडे गावातील विजेचे खांब गंजलेले आहेत ते बदललेले नाहीत. सैतवडे इंदिरा आवासकडे जाणारा विजेचा खांब तुटला असून, वीजपुरवठा बंद झाला. या परिसरात अजून तीन विजेचे खांब मोडकळीस आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com