बांधकाममधील निवृत्तांनी घेतला पुनर्भेटीचा आनंद

बांधकाममधील निवृत्तांनी घेतला पुनर्भेटीचा आनंद

-rat११p३०.jpg-
P२४M८९४५४
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवानिवृत्तांच्या स्नेहमेळाव्यात ८० वर्षांवरील सेवानिवृत्तांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासमवेत संयोजक सुभाष थरवळ, मोतीराम घरबुडे, हेमंत पगारे आदी.
--------------

निवृत्तांनी घेतला पुनर्भेटीचा आनंद

सार्वजनिक बांधकाम विभागाचा स्नेहमेळावा : जुन्या आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. ११ : सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्तांनी किमान २-३ वर्षांनी स्नेहमेळावे आयोजित करावेत. मेळाव्यामुळे पुनर्भेटीचा आनंद मिळतो. आज ८० वर्षांवरीलही ज्येष्ठ मेळाव्याला उपस्थित राहिले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असे भावुक उद्गार सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्तांच्या स्नेहमेळाव्यात समितीप्रमुख सुभाष थरवळ यांनी व्यक्त केले.
टीआरपी येथील अंबर हॉल येथे आज दिवसभर हा स्नेहमेळावा रंगला.

व्यासपीठावर सेवानिवृत्त सेक्रेटरी मोतीराम घरबुडे, समिती समन्वयक किसन माने, हेमंत पगारे, एन. ए. मर्चंट, पी. पी. जोशी, विलास यादव, संयोजक सुभाष थरवळ, ए. व्ही. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यासाठी दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंतचे ३००हून अधिक सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहिले. मेळाव्यानिमित्त रत्नसिंधु या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. विलास यादव व आर. डी. भाटकर यांचाही विशेष सत्कार या वेळी केला. बेलवलकर व वडके यांनी नोकरीतील सुखद आठवणींना उजाळा दिला. सुधाकर देवस्थळी यांच्या भक्कम सहकार्याने सा. बां. खाते सेवानिवृत्तांचा स्नेहमेळावा रत्नागिरीत झाला होता. त्यात १२४ जण सहभागी झाले होते. आज पुन्हा २० वर्षांनंतर हा मेळावा साजरा झाला. दुपारनंतर हलकफुलके विविध गुणदर्शन कार्यक्रम झाले. गाणी, नृत्य, विनोदी चुटके अशा कार्यक्रमांतून सर्वांचीच करमणूक झाली.
-------
चौकट १
यांचा झाला सन्मान
या वेळी ८० वर्षांवरील सेवानिवृत्तांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये रामनाथ बेलवलकर, रामचंद्र वडके, विठ्ठल डांगे, दत्तात्रेय नलावडे, सुधाकर देवस्थळी, सुरेश लिमये, श्रीनिवास गोरे, अविनाश त्रिंबको, सदानंद भावे, हरिश्चंद्र हातिसकर, सुभाष थरवळ, सुषमा थरवळ, प्रभुसिंग जमादार, तुळशीदास शेट्ये, पुंडलिक राणे यांचा समावेश होता. या सत्कारामुळे सर्वजण भावुक झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com