दाभोळ-विद्यापिठांच्या २० वाणांना मंजुरी

दाभोळ-विद्यापिठांच्या २० वाणांना मंजुरी

89474
..........
विद्यापिठांच्या २० वाणांना मंजुरी
अकोल्यात बैठक; २५० उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा समावेश
दाभोळ, ता. ११ : कृषी तंत्रज्ञानात्मक शिफारशींच्यादृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापिठांची त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापिठांचे २० पीक वाण, आठ यंत्रे व अवजारे आणि २५० उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञानांना मंजुरी देण्यात आली आहे. हे संशोधन या हंगामापासून अंमलबजावणीसाठी उपलब्ध होणार आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठात संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीचा समारोप झाला. महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारोपीय कार्यक्रमाला चारही कृषी विद्यापिठाचे संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. संशोधनाद्वारे राज्यातील कृषी क्षेत्र आज सक्षम झाल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले तर भविष्यातील कृषी संशोधनाची दिशा शेतकरीभिमुख असण्याची गरज डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केली. कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न समजून त्यावर काळानुरूप उपाययोजना सुचवणे आवश्यक असल्याचे डॉ. संजय संजय भावे यांनी सांगितले.
विविध तांत्रिक सत्रामध्ये गटनिहाय झालेल्या संशोधनात्मक सादरीकरणाचे निष्कर्ष व गुणवत्ता, सखोल विचारमंथनातून पिकांचे सुधारित नवीन आशादायक वाण, सुधारित अवजारे व नावीन्यपूर्ण यंत्रे तसेच उपयुक्त कृषी तंत्रज्ञानविषयक शिफारशींना अंतिम मान्यता देण्यात आली. मंजूर पीक वाण, शिफारशी तथा इतर उपलब्धीचे डॉ. राजेंद्र गाडे, डॉ. आम्रपाली शिखरे, डॉ. व्ही. एल. आमोलिक आदींनी सादरीकरण केले. चारही कृषी विद्यापिठांमधून सेवानिवृत्त होणाऱ्या शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.

चौकट
पुढील बैठक परभणीला
राज्यातील चारही कृषी विद्यापिठांची संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची पुढील वर्षी ५३वी बैठक परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com