लांजा-इंदवटीतील २५ कुटुंबांच्या पुनर्वसनाला वेग

लांजा-इंदवटीतील २५ कुटुंबांच्या पुनर्वसनाला वेग

इंदवटीतील २५ कुटुंबांच्या पुनर्वसनाला वेग
दरडग्रस्त, भूस्खलन क्षेत्र; १४ ला ग्रामसभा
लांजा, ता. ११ ः लांजा तालुक्यातील अतिवृष्टी दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवण क्षेत्रातील इंदवटी-बाईतवाडी येथील २० घरांचे २५ कुटुंबाचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यातील ६ कुटुंबे स्वतःहून स्थलांतरित होण्यासाठी प्रस्तावित जागेचा अहवाल देण्याच्या सूचना तहसीलदारांनी भूवैज्ञानिकांना दिल्या. १४ जूनला इंदवटी येथे ग्रामसभा होणार आहे.
तालुक्यातील १८० कुटुंबांना सतर्कतेच्या आणि स्थलांतरितच्या लांजा महसूल विभागाच्यावतीने नोटिस दिल्या आहेत‌. वनगुळे-बौद्धवाडी येथे भूस्खलनचा धोका असल्याने येथील कुटुंब अतिवृष्टीवेळी समाजमंदिरात रात्रीच्यावेळी स्थलांतर होतात. दरडग्रस्त ठिकाणी नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी अतिजोखिम कुटुंबातील व्यवस्था करण्याचे प्रयोजन आहे. तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे भूगर्भ शास्त्रज्ञातर्फे सर्वेक्षण करून गावे निश्चित करण्यात आली आहेत. अतिवृष्टी जोखीम भागात खोरनिनको-साईनगर मुसळेवाडी येथील २५ घरे, वनगुळे ५ घरे, इंदवटी ९, खावडी-भोवडवाडी १५, गोळवशी-तेलीवाडी २०, साटवली-तालयेवाडी, भांडारवाडी ३४, भांबेड- दत्तमंदिर १, वेरवली-पाथरेवाडी ११, कुरंग १३, निवसर-मुस्लिमवाडी ४०, इंदवटी-बाईतवाडी २, गांगरकर कोकण रेल्वेट्रॅक-बोगदाशेजारी ५, कोल्हेवाडी १ या ठिकाणी या कुटुंबांना सतर्कता आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com