आमदार नाईकांची काळजी करू नका

आमदार नाईकांची काळजी करू नका

89489

आमदार नाईकांची काळजी करू नका

बाबी जोगी ः ‘जायंट किलर’ ओळख कायम राहील

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ११ : लोकसभेतील एका पराजयाने शिवसैनिक (ठाकरे गट) खचलले नाहीत, तर नव्या उमेदीने येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. ‘जायंट किलर’ म्हणून ओळख असलेल्या आमदार वैभव नाईक यांची ही ओळख शिवसैनिक, मतदार जनता निश्चितच ठेवेल आणि त्यांना मंत्रीही बनवतील. त्यामुळे टीकाकारांनी आमदारांची काळजी करू नये, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केली.
याबाबत जोगी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला. तरीही केंद्रीय मंत्री असलेल्या उमेदवाराला शहरातून मिळालेले मताधिक्य पाहता त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठे अपयश म्हणावे लागेल. जास्त मताधिक्य मिळविण्यापासून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी रोखण्यात यश मिळविले आहे. आमच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी या पराजयाने खचून न जाता येणाऱ्या पुढील निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी शिवसैनिक सज्ज आहेत.
लोकसभा निवडणुकीतील विजयाने विरोधकांनी हुरळून जाऊ नये. कारण या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला. आमदारांच्या माध्यमातून या मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जनता विरोधकांना त्यांची जागा निश्चितच दाखवून देईल. सर्व शिवसैनिक आमदार नाईक यांना कुडाळ-मालवण मतदारसंघातून निवडून आणतील आणि महाराष्ट्रात मंत्री बनवतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
---
नाईकांना मंत्री झालेले पहायचेय
मालवण-कुडाळमधील जनतेलाही आमदार नाईक यांना मंत्री झालेले पाहायचे आहे. त्यामुळे या एका पराजयाने आमदारांवर टीका करणाऱ्यांनी प्रथम त्यांचा इतिहास पाहावा. राज्यात ‘जायंट किलर’ म्हणून आमदारांची ओळख आहे, ती शिवसैनिक, मतदार जनता तशीच ठेवेल आणि त्यांना मंत्रिपदावर विराजमान करतील. त्यामुळे टीकाकारांनी आमदार नाईक यांची काळजी करू नये. त्यांची काळजी घेण्यास शिवसैनिक आणि जनता समर्थ आहे, असेही जोगी यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com