अस्तान-धनगरवाडी रस्त्यावर दरड कोसळली

अस्तान-धनगरवाडी रस्त्यावर दरड कोसळली

- rat११p४२.jpg-
२४M८९५०७
खेड ः अस्तान धनगरवाडी रस्त्यावर कोसळलेली दरड.
------------
अस्तान-धनगरवाडी रस्त्यावर दरड कोसळली

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ११ : तालुक्यातील आंबवली विभागातील अस्तान धनगरवाडी मार्गावर सोमवारी (ता. १०) रात्रीच्या सुमारास रस्त्यावर माती सदृश्य दरड रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.
तालुक्यातील आंबवली भागासह परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. आंबवली-अस्तान गावातील धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. या ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या कामामुळे ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अस्तान परिसरात रस्त्याचे काम करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कामामुळे हा मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याचे बोलले जात आहे. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसून केवळ रस्त्यावर मातीचा ढिगारा आल्याची प्राथमिक माहितीसमोर येत आहे. हा ढिगारा हटविण्यासाठी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून सायंकाळी उशिरापर्यंत हा ढिगारा काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान माती सदृश्य दरड हटविताना वरून मोठ्या प्रमाणात माती घसरण्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तविण्यात येत आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असून तालुका प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com