तृतीयपंथी वेशात फिरणाऱ्या
‘त्या’ तिघांवर गुन्हा दाखल

तृतीयपंथी वेशात फिरणाऱ्या ‘त्या’ तिघांवर गुन्हा दाखल

तृतीयपंथी वेशात फिरणाऱ्या
‘त्या’ तिघांवर गुन्हा दाखल
सावंतवाडी ः तृतीयपंथीयाच्या वेशात फिरून सावंतवाडीकरांना पैशासाठी हैराण करणाऱ्या जळगाव येथील ‘त्या’ तिघांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा जगदो सोळंके (वय २०), संजय मगन सोळंके (वय ४७) आणि ईश्वर छगन सांळुखे (वय २२, तिघे रा. जळगाव, जि. बुलढाणा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर राहून मोठमोठ्याने आरडाओरड केल्याप्रकरणीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती तपासिक अंमलदार श्रीकांत इंगवले यांनी दिली. ते तिघे तृतीयपंथीयांच्या वेशात शहरात फिरत होते. पैसे मागण्यासाठी अनेक नागरिकांच्या घरात घुसणे, त्यांना धमक्या देणे, पैसे मागणे आदी प्रकार त्यांच्याकडून सुरू होते. याबाबतची तक्रार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार सोमवारी (ता.१०) येथील गवळीतिठा परिसरातून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी व वैद्यकीय चाचणी केल्यानंतर ते तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. याबाबतची तक्रार पोलिस हवालदार मनोज राऊत यांनी दिली आहे.
----------
पालकमंत्री चव्हाण
आज मालवणात
मालवण : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उद्या (ता. १२) सकाळी ९.३० वाजता दैवज्ञभवन येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विधानसभा प्रमुख नीलेश राणे हे उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com