कंटेनर

कंटेनर

२४M८९५५६
खेड : भरणे येथील जगबुडी पुलावर दुभाजकावर थांबलेला कंटेनर

‘जगबुडी’त कोसळताना वाचला कंटेनर

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ११ : मुंबई गोवा महामार्गावर आज सायंकाळी भरणे पुलावर मुंबई कडून गोव्याकडे जाणारा माल वाहतूक कंटेनर जगबुडी नदीत कोसळता कोसळता वाचला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी झाल्यानंतर वादात सापडला आहे. भरणे येथील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेले पुल धोकादायक बनले असून सातत्याने येथे अपघात होत आहेत.
आज आज सायंकाळी ६.४५ च्या सुमारास मुंबई हून गोव्याकडे जाणारा कंटेनर वरील चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर जगबुडी पुलावर दोन पुलांच्या मधील दुभाजकावर आदळला. यावेळी दूभाजकाच्या मधोमध दोन्ही पुलांच्या मधील मोकळ्या जागे पासून काही फुटावर कंटेनर नदीत कोसळता कोसळता वाचल्याने ही घटना पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे प्रसाद गांधी, रुपेश पवार, प्रतीक पाटणे, विलास पाटणे यांनी घटनस्थळी जाऊन कंटेनर चालकाला मदत केली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी महामार्गावरील वाहतुकीचा मात्र खोळंबा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com