पंचायत कर्मचारी समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

पंचायत कर्मचारी समिती आंदोलनाच्या पवित्र्यात

Published on

पंचायत कर्मचारी समिती
आंदोलनाच्या पवित्र्यात

लांजा ः लांजा नगरपंचायतीचे पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत सेवा केलेल्या कर्मचारी यांना नगरपंचायत सेवा अधिनियमनुसार वेतन आणि फरक मिळावा यासाठी राज्य नगर पालिका आणि नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समिती आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. जिल्हाधिकारी यांना या समितीने निवेदन सादर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १ जुलैला लाक्षणिक उपोषण आणि ६ ऑगस्टला प्रत्येक नगरपंचायत आणि नगर पालिका कर्मचारी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीमध्ये माजी कर्मचारी ग्रामपंचायत सेवेमध्ये कायम होते. गेल्या सात वर्षापासून सर्व कर्मचारी लाभांपासून वंचित आहेत. त्यातील काहीजण नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत; परंतु या कर्मचाऱ्यांना नगरपंचायत सेवालाभ मिळाले नाही. ग्रामपंचायत सेवा ही या कर्मचाऱ्यांन धरून यांना लाभ देण्यात यावेत, अशी मागणी आहे. नगरपंचायतमध्ये समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे. आशास्वित प्रगती योजनेचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळावा, कंत्राटी कर्मचारी यांना कायम करण्यात यावे, नगर पालिका, नगरपंचायत यांना समान वेतन देण्यात यावे, जो जकातकर रद्द करण्यात आला आहे तो पुन्हा सुरू करावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.

-------

rat२८p१०.jpg ः
P२४M९३३२४
कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास चोरगे, शिक्षक महेश कुलकर्णी, सचिन चिले, संतोष शिंदे, शिक्षिका अनघा राजेशिर्के, रजनीगंधा पवार, प्रज्ञा जठार तसेच शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी.

आंबडस विद्यालयात
राजर्षी छत्रपती शाहू जयंती

सावर्डे ः रयतेचा राजा, बहुजनांचा आधार असणारे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज आंबडसमध्ये आदरपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी १२वी कॉमर्समधील विद्यर्थिनी साक्षी कदम हिने राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा विस्तारपूर्वक आढावा घेतला. आजच्या पिढीने आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नकळत मागे पडलेल्या वाचनाचा उल्लेख करत थोर नेत्यांची चरित्रे आपण आग्रहाने वाचली पाहिजेत, अशी कळकळ व्यक्त केली. शिक्षक मनोगतातून कृष्णकांत कुंभार यांनी राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक आणि राजकीय कार्य दाखले देत विशद केले. सूत्रसंचालन सानिया मोरे या विद्यार्थिनीने केले.
-----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.