भात बियाणे, खतांचे
पारपोलीत वितरण

भात बियाणे, खतांचे पारपोलीत वितरण

Published on

भात बियाणे, खतांचे
पारपोलीत वितरण
ओटवणे ः सिंधुदुर्ग कृषी विभागाच्या सिंधुरत्न योजनेंतर्गत ‘एक गाव, एक वाण’ या अभियानाचा प्रारंभ पारपोली येथे जिल्हा कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्या उपस्थितीत झाला. अभियानांतर्गत ५० हेक्टरसाठी एकाच भात बियाण्याची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पारपोलीतील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या या योजनेसाठी प्रतिसाद देत ‘श्री’ पद्धतीने लागवड केली. यासाठी पाच क्विंटल ‘रत्नागिरी-८’ या जातीच्या भात बियाण्याचे वाटप केले होते. जिवाणू झिंक सल्फेट या खतांचे वाटप केले. अभियानात पारपोलीतील शेतकऱ्यांनी भाग घेतला. बाळकृष्ण डांगी, विठ्ठल गावकर, प्रमोद परब यांच्या भातशेतीत राऊत यांच्या उपस्थितीत लावणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. अभियान यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक नागनाथ साखरे यांनी नियोजन केले. प्रभारी सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी युवराज भुईंबर, कृषी पर्यवेक्षक यशवंत सावंत, विजय पाटील, कृषी सहाय्यक नागनाथ साखरे, कृषी सहाय्यक स्वप्नील शिर्के, सुजाता पाटील, सावंता घेरडे, अक्षय खराडे, अनमोल गावडे, श्रीमती रेडकर आदी उपस्थित होते.
------
सावंतवाडीत रविवारी
कॅरम प्रशिक्षण
सावंतवाडी ः मुक्ताई ॲकॅडमीच्या जिल्ह्यातील मुलामुलींसाठी मोफत कॅरम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात पुढील महिन्यापासून होणाऱ्या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीयस्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणाऱ्या गुणांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिर येथील खासकीलवाडा (राजवाड्यानजीक) येथे पाटणकरांचा वाडा येथे रविवारी (ता. ७) सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांनी कौस्तुभ पेडणेकर यांच्या मोबाईल क्रमांकावर नावनोंदणी करावी. सहभाग घेणाऱ्या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, आवाहन श्री. पेडणेकर यांनी केले आहे.
...........
कणकवली रुग्णालयात
औषधसाठा उपलब्ध
कणकवली ः पावसाळ्यात साथीचे विविध रोग फैलावण्याची शक्यता असते. याबाबत कणकवली उपजिल्हा रुग्णालयही सतर्क झाले आहे. साथरोगाच्या गोळ्या, औषधसाठा रुग्णालयात उपलब्ध आहे. गरज पडल्यास औषध, गोळ्यांचा अतिरिक्त साठाही उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केल्याची माहिती रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी दिली. डेंगी, लेप्टो सदृश बहुतांश रुग्ण कणकवली उपजिल्हा रुग्णालयात येतात. पुरुष कक्षाची दुरुस्तीही झाल्याने रुग्णालयात बेडही उपलब्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.